Balasaheb tavre as Sunetra Pawar political campaign chief in Baramati
Balasaheb tavre as Sunetra Pawar political campaign chief in Baramati  Sakal
पुणे

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांचे प्रचारप्रमुख म्हणून बाळासाहेब तावरे

मिलिंद संगई, बारामती

बारामती : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय प्रचारप्रमुखाची नियुक्ती केली जाणार असून बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी बाळासाहेब तावरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दरम्यान सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी 18 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात भरला जाणार आहे. या अगोदर सकाळी साडेनऊ वाजता पुणे जिल्हा परिषदेजवळ पुना क्लबच्या समोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे पाटील, खासदार मेघा कुलकर्णी, रुपाली चाकणकर, प्रदीप रावत, अनिल शिरोळे, संजय काकडे, हर्षवर्धन पाटील,

विजय शिवतारे यांच्यासह आमदार दत्तात्रय भरणे, भीमराव तापकीर, दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, राहुल कुल, सुनील शेळके, अतुल बेनके, सुनील टिंगरे, चेतन तुपे, माधुरी मिसाळ, अश्विनी जगताप, सिध्दार्थ शिरोळे, सुनील कांबळे, अण्णा बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती किरण गुजर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT