balewadi 6 days sewage channel blocked sewage water in society health risk
balewadi 6 days sewage channel blocked sewage water in society health risk  sakal
पुणे

Pune News : बालेवाडी येथे 6 दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबून सोसायटीत पसरले सांडपाणी ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शीतल बर्गे

बालेवाडी : येथील साई सिलिकॉन व्हॅली, व संस्कृती होम्स या सोसायटी जवळील रस्त्यावर सांडपाणी वाहिनी तुंबल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी या सोसायटीच्या परिसरात पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .महापालिकेकडून प्रयत्न करूनही हा प्रश्न सुटला नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.

बालेवाडी येथील संस्कृती होम्स व साई सिलिकॉन व्हॅली सोसायटी जवळ रस्त्यावर गेल्या सहा दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने सोसायटीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी तुंबून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे .त्याचबरोबर डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाकडून ही वाहिनी साफ करून घेण्यात आली .तरी हा प्रश्न जैसे थे राहीला आहे. त्यातच पाऊस पडत असल्याने हे पाणी वाढत चालले आहे .गेल्या चार दिवसांपासून क्षेत्रीय कार्यालयाच्या सांडपाणी विभागाकडून येथे काम करण्यात येत आहे.

बालेवाडीतील साई चौकातून एक नाला पुढे कोणार्क टॉवर कडे वाहतो. परंतु अतिक्रमणांमुळे हा नाला पुढे गायब झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा नाही .त्यामुळे हे सर्व पाणी सांडपाणी वाहिनीतून उलट दिशेने सोसायट्यांमध्ये शिरत आहे. तसेच दोन चेबर स्मार्ट सिटी कडून विकसित करण्यात आलेल्या बागेमध्ये असल्याने तेथे खोदकाम करण्यासाठी त्यांची परवानगी घेणे गरजेचे आहे .अशी माहिती औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय सांडपाणी वाहिनी कनिष्ठ अभियंता अस्मिता घोगरे यांनी दिली.

गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी जेट मशीन लावले होते. पाणी जास्त असल्यामुळे जेट मशीनचा उपयोग या ठिकाणी होत नाही. येथे पावसाचे पाणी वाहून जायला जागा नाही त्यामुळे पावसाळी वाहिनी टाकणे गरजेचे असल्याने मनपा पथ विभाग, स्मार्ट सिटी अधिकारी यांच्याबरोबर मंगळवारी संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांच्या आयोग्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

औंध क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त - गिरीश दापकेकर

गेल्या सहा दिवसांपासून आम्ही हे सांडपाणी तुंबल्याने त्रस्त झालो आहोत. आमच्या सोसायटीत बोअर वेल या पाण्यामुळे बंद पडले आहे. त्यामुळे टँकर मागवावे लागत आहेत. सर्व सोसायटीत रस्त्यावर सांडपाणी साठून दुर्गंधी पसरली आहे .परिस्थिती खूप गंभीर असून शासनाने तातडीने उपाययोजना करावी ही विनंती .

जतिन सराफ - संस्कृती होम्स

आमच्या सोसायटीतील क्लब हाऊस मध्ये ,त्याचबरोबर बागेच्या परिसरामध्ये संपूर्ण पाणी तुंबले आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे , डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे . तरी प्रशासनाने तातडीने यावरती उपाय योजना कराव्यात ही विनंती.

सचिन पाटे . साई सिलिकॉन व्हॅली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT