bandicoot-robot
bandicoot-robot 
पुणे

गटारे साफ करणाऱ्या रोबोचा होणार सन्मान

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गटारात उतरून मैला काढण्याचे काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना करावे लागते. आता हे काम करण्यासाठी जेनरोबोटिक्‍स कंपनीने ‘बॅंडीकॉट’ नावाच्या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. या यंत्रमानवाला या वर्षीचा ‘अंजनी माशेलकर सर्वसमावेशक नवतंत्रज्ञान’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अनोखे अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. देशातील सुमारे सहाशे जिल्ह्यांमध्ये ५३ हजार स्वच्छता कर्मचारी बंदिस्त गटारांची स्वच्छता करतात. देशभरात सुमारे तीनशे मृत्यू बंदिस्त गटार साफ करताना झाले असल्याचे विविध माध्यमांतून पुढे आले आहे. या नवसंशोधनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अमानवी श्रम वाचविण्यास मदत होणार आहे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित सातव्या सामाजिक नवकल्पना राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन सोहळ्यात उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते १७ नोव्हेंबरला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. समाजातील विविध समस्यांवर तांत्रिक पद्धतीने उपाय शोधणाऱ्या संस्थेस अथवा व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT