ज्येष्ठ नेते शरद पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार  sakal
पुणे

ग्रामीण मुलांना आता ऑक्सफर्डचा अभ्यासक्रम भारतातून करणे शक्य

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : ग्रामीण भागातील मुलांना जगातील सर्वोत्तम ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेता यावा या साठी अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने व मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने येत्या काही दिवसात कृषीविषयक आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्याचा औपचारिक प्रारंभ आज शरद पवार यांच्या हस्ते बारामतीत झाला. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.

संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, ऑक्सफर्डचे डॉ. अजित जावकर, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही. प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, सचिव अँड. नीलीमा गुजर, विश्वस्त किरण गुजर यांच्यासह डॉ. शरदचंद्र लोहोकरे, डॉ. संजीव तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

ग्रामीण भागासह महाराष्ट्रातील मुलांना कृषीविषयक अत्याधुनिक ज्ञान व जोडीला ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळेल ही बाब त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरेल, असे सांगून शरद पवार म्हणाले, शेती अनेक अर्थाने बदलते आहे, पाण्याचा वापर, हवामानातील बदल, पिकांवर त्याचा होणारा परिणाम या सारख्या बाबींमुळे शेती अडचणीत येऊ शकते, या पार्श्वभूमीवर संशोधन होणे व त्याला ऑक्सफर्डसारखे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणे ही बाब महत्वाची ठरणार आहे.

डॉ. अजित जावकर यांनी या अभ्यासक्रमाची रचना व या संयुक्त प्रयत्नांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने गेल्या 50 वर्षात जे काम केलेले आहे, ते पाहता मला ऑक्सफर्डच्या लोकांना फार काही सांगावेच लागले नाही, ट्रस्टकडे शेतीशी संबंधित संशोधनापासून डेटापर्यंत सर्व बाबी आहेत, युध्दजन्य परिस्थिती पाहता युरोपियन देशांची अन्नसाखळी विस्कळीत होण्याची भीती आहे, अशा स्थितीत कृषी विषयक हा अभ्यासक्रम अधिक महत्वाचा ठरेल. मायक्रोसॉफ्ट देखील भविष्यात यात सहभागी होणार आहे. वातावरणातील बदल हा घटक आगामी काळात महत्वाचा ठरणार असून याचा फायदा या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होईल.

प्रतापराव पवार यांनी या प्रसंगी डॉ. अजित जावकर यांच्या सहकार्यामुळेच हा अभ्यासक्रम बारामतीत सुरु करणे शक्य झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, ऑक्सफर्डला कृषी क्षेत्रात काम करण्यात रस आहे हे समजल्यावर बारामतीतील अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टशी मी त्यांचे बोलणे करुन दिले व सहा महिन्यात अभ्यासक्रम सुरु करण्यापर्यंत प्रवास आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा वापर अधिक व्हावा असा यात प्रयत्न आहे.

ज्या संस्था आपण चालवतो त्याचा समाजाला फायदा काय याचा विचार होणे महत्वाचे आहे. योग्य व्यक्तींना योग्य ठिकाणी संधी देऊन त्याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करुन घेण्याचे आमचे धोरण आहे. नीलेश नलावडे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. जया तिवारी यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT