Ramdas Athawale
Ramdas Athawale sakal
पुणे

Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी काढला महायुतीला चिमटा, म्हणाले..!

सकाळ वृत्तसेवा

दौंड - राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) असे तीन पक्षाचे सरकार आहे, असे तुम्ही सारखं म्हणता. पण आम्ही रिपब्किलन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पण तुमच्यासोबत आहोत हे ध्यानात असू द्या, असा चिमटा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर काढला आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत बोलताना रामदास आठवले यांनी हा चिमटा काढला.

उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह वासुदेव काळे, प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, प्रेमसुख कटारिया, सूर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, रवींद्र कांबळे, नागसेन धेंडे, आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, विरोधक नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलतील, असा खोटा प्रचार करीत आहे. राज्यघटना बदलण्याचा प्रश्नच येत नाही आणि जो तसा प्रयत्न करेन त्याला आम्ही देशातून हाकलून लावू.

केंद्रीय अर्थसंकल्पात माझ्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयासाठी १ लाख ५९ हजार कोटी रूपयांची तरतूद आहे.

तर आदिवासी विकास मंत्रालयासाठी १ लाख ३३ हजार कोटी रूपयांची तरतूद आहे. मला सुप्रिया सुळे यांचा आदर आहे, पण आता संसदेत बोलण्यासाठी समंजस लेक आणि सून असणार्या सुनेत्रा अजित पवार यांना मत देत दिल्लीत पाठवा.

अजित पवार म्हणाले, सूर्य व चंद्र आहे तोपर्यंत भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना कोणी बदलू शकणार नाही. दहा वर्षांच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्याकरिता महायुतीच्या उमेदवारास विजयी करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

OYO IPO: लवकरच येणार ओयोचा आयपीओ; सेबीकडे पुन्हा कागदपत्र जमा करण्याच्या तयारीत

Virat Kohli on Chris Gayle : RCBमध्ये पुन्हा एकदा एंट्री करणार युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल? विराट कोहलीने दिली ऑफर

Healthy Diet For Kids : मुलांच्या निरोगी वाढीसाठी आहारात ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश, मिळतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT