sharad pawar
sharad pawar  esakal
पुणे

Sharad Pawar : सगळ्याच निवडणूका बारामतीकरांनी केल्या

मिलिंद संगई

बारामती - पहिल्यांदा निवडणूकीला सामोरे गेलो तेव्हा माझे वय अवघे 26 वर्षांचे होते, त्या वेळी एका साखर कारखान्याचे अध्यक्ष माझे विरोधक होते....अशी आठवण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जागवली.

बारामतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भिगवण चौकातील कार्यालयास सोमवारी (ता. 11) पवार यांनी भेट दिली. त्या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, त्या वेळी मी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना कसे पराभूत करणार अशी चर्चा होती मात्र ती निवडणूक युवापिढीने हातात घेतली, सायकलवर फिरुन प्रचार केला, लोकांनी मला निवडून दिले. त्यानंतर बारामती व महाराष्ट्राने कधीही मागे पाहायला लावले नाही. लोकांनी इतके प्रेम दिले की मी प्रचारालाही येत नसे, शेवटच्या सांगता सभेला मी यायचो.

बारामतीकरांच्या या प्रेमामुळे सरकार चालविण्याची संधी मला मिळाली, चार वेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री, कृषीमंत्री व इतर जबाबदा-या सांभाळत जे करणे शक्य होते ते केले. विनोदकुमार गुजर, धो.आ. सातव या सारख्या अनेकांनी याचा पाया घातला होता. लोकांमध्ये जागृती करुन मला निवडून दिले.

देशाच्या संसदेतील 588 खासदारांपैकी पहिल्या तीन खासदारात सुप्रिया सुळे यांचे नाव आहे याचा आनंद आहे. राजकारणात स्वच्छ कामाचा आदर्श तिने घालून दिला आहे. तीन निवडणूकीत विक्रमी मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

यंदा चित्र काही वेगळेच आहे, पण तरीही चिंता करण्याचे कारण नाही, ज्यांना सगळी पदे मिळाली ते दिसत नाही, ज्यांना कसलीच पदे मिळाली नाहीत पण पदाधिका-यांना ज्यांनी मोठे केले ते आज इथे आहेत. तुतारी फुंकणारा माणूस ही खूण महाराष्ट्राला जागे करणारी आहे, राज्यात तिचा आवाज पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT