Bhor Election Result 2021 Pune Gram Panchyat Election Result 2021 
पुणे

Bhor Election Result 2021 : नसरापूरमध्ये विकास पॅनलची सरशी

सकाळवृत्तसेवा

नसरापूर(भोर, पुणे) : नसरापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाक क्रमांक 1 आणि 4 क्रमांकाच्या प्रभागात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नसरापूर विकास पॅनलचा निर्विवाद विजय झाला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. नसरापूर मधील प्रभाग क्रमांक दोन आणि 3 मधील निवडणूक बिनविरोध झाली होती. याठिकाणी देखिल नसरापूर विकास पॅनलचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

Purandar Election Result: पुरंदर तालुका ग्रामपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व; जाणून...

प्रभाग क्रमांक 1 व 4 मध्ये विकास पॅनल विरुद्ध नसरापूर जनशक्ती ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली होती. प्रभाग क्रमांक एक मध्ये विजयी उमेदवार इरफान मुलाणी मते- 304, सपना झोरे मते-331, अश्विनी कांबळे मते-303 हे नसरापूर विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 4 मध्ये विजयी उमेदवार गणेश दळवी मते-288, उषा कदम मते-356  हे नसरापूर विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले तर एका जागेवर  मेघा लष्कर मते- 349  या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या आहेत. 

वेळू आणि दिवळे गावात चिठ्ठी वर निकाल
मतमोजणीच्या पहिल्या  फेरीत भोर तालुक्यातील दिवळे आणि वेळू गावातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून विजय उमेदवार निवडण्यात आला. यामध्ये दिवळे गावातून निलेश पांगारे आणि वेळू गावातून सारिका जाधव हे निवडून आले आहेत. पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला असून केवळ एका प्रभागाची निवडणूक  असलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे.

केंजळ ग्रामपंचायत विजयी उमेदवार सुवर्णा महादेव काळे,अंजुशा रोहीदास येवले, किरण सोमनाथ जाधव (बिनविरोध),शितल राऊत (बिनविरोध), किरण मारूती येवले, सविता आनंद बाठे, राकेश तुळशीदास बाठे,उत्तम किसन शेटे, कविता अजय बाठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT