
ग्रामपंचायतीच्या १० जागांसाठी निवडणूक झाली
सासवड- पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, जिल्हा परिषद माजी सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी नेते संभाजी झेंडे यांच्या पॅनलचा त्यांच्या गावात अनुक्रमे पिसर्वे, वाळुंज, दिवे गावात पराभव झाला. लक्ष लागून राहिलेल्या या दिवे ग्रामपंचायत जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भाजप नेते बाबा जाधवराव यांनी काँग्रेसजनांना बरोबर घेत.. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या संमिश्र पॅनलचा दारुण पराभव केला. शिवाय नीरा या सर्वाधिक मोठ्या गावात काँग्रेसचे राजेश काकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा पराभव करीत पॅनलकडे तब्बल 13 जागा जिंकून आणल्या. विरोधी चव्हाण गटाला फक्त चार जागा मिळाल्या. याशिवाय काळदरीचे माजी सरपंच यांची अनेक वर्षांची सत्ता या निवडणुकीत गेली.
Gram Panchayat Results : चंद्रकांत पाटलांचा होम पिचवर पराभव, पराभवावर आदित्य...
पिसर्वे येथे शिवसेना व काँग्रेस यांचे संयुक्त पॅनल विजयी झाले तर वाळूज येथे रमेश इंगळे यांचे शिवसेनेचे पॅनल विजयी झाले. पारगाव येथे पारंपरिक पारेश्वर पॅनल विजय झाले पिंपरी येथे विजय झाले. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शिवसेनेचे स्वतंत्र पॅनल द्वारे बहुमत आले आहे. कित्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी आघाडी बहुमतात आली आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस व शिवसेना अशी ही आघाडीही दिसत आहे. थोड्याफार ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना आणि काही निवडक गावात भाजप-शिवसेना, भाजप-काँग्रेस अशी आघाडी बहुमतात आहे. पक्षीय आघाड्यांप्रमाणे काही गावकी, भावकी, गटांच्या आघाड्याही दिसतात. ते लगेच पक्षीय रंग देणे टाळताना दिसले.
१) राजेवाडी
प्रभाग क्रमांक एक -:
विजयी उमेदवार- दत्तात्रय सोपान जगताप, ताराबाई बबन राऊत, नंदा प्रल्हाद जगताप
प्रभाग क्रमांक दोन -:
विजयी उमेदवार- रामदास बाबुराव जगताप, आशा संतोष जगताप
प्रभाग क्रमांक तीन -:
विजयी उमेदवार- राजेंद्र ज्ञानोबा शिंदे, मंदा ज्ञानेश्वर जगताप
Mulshi Election Result 2021: चांदे ग्रामपंचायतीचा निकाल लागला; जाणून घ्या...
२) आस्करवाडी ग्रामपंचायत
प्रभाग क्रमांक एक -:
विजयी उमेदवार - संदीप दामोदर वाडकर
प्रभाग क्रमांक दोन -: अनंता धोंडीबा मोरे, अश्विनी निलेश जगताप
प्रभाग क्रमांक तीन -: ज्योती परशुराम वाडकर, निलम जालिंदर वाडकर
३) वाळूंज ग्रामपंचायत
प्रभाग क्रमांक एक -:
विजयी उमेदवार- कैलास महादेव म्हेत्रे, योगिता विलास इंगळे
प्रभाग क्रमांक दोन- अनिल विठ्ठल इंगळे, निता गणेश खोमणे
प्रभाग क्रमांक तीन- कैलास फकीर इंगळे, रेश्मा राहुल चौरे
४) कोळविहिरे ग्रामपंचायत
- प्रभाग क्रमांक एक- बापू तात्याबा भोर, निता सोमनाथ खोमणे, निर्मला बाळासाहेब पवार
- प्रभाग क्रमांक दोन- विलास सुदाम घाटे, स्वाती प्रशांत जाधव, विमल विलास नाणेकर
प्रभाग क्रमांक तीन- धाकू भगवान सोनवणे, मिनाक्षी दिलिप झगडे
प्रभाग क्रमांक चार - विशाल रामदास घोरपडे, महेश रामदास खैरे, कुसुम प्रताप गरुड
५) कुंभारवळण ग्रामपंचायत
प्रभाग क्रमांक एक-अमोल दत्तात्रय कामठे , निलम संतोष कुंभारकर
प्रभाग क्रमांक दोन- नंदू धोंडिबा कामथे, अश्विनी सतिश खळदकर
प्रभाग क्रमांक तीन-संदीप अरुण कामठे,मंजुषा गोपाळ गायकवाड
६) काळदरी ग्रामपंचायत
प्रभाग क्रमांक एक- अंकुश दिनकर परखंडे, शारदा पांडुरंग जाधव, दमयंती तुळशीराम पेटकर
प्रभाग क्रमांक दोन- देवदास गोकुळ यादव , अशोक लक्ष्मण भगत , अनिता तुषार कारकर
प्रभाग क्रमांक तीन- गणेश सोमनाथ जगताप, राणी राहुल थोपटे, अलका महादेव पिसाळ
Gram panchayat Election: मंत्री भुमरेंनी सत्ता राखली; ग्रामपंचायत निवडणुकीत...
७) सोमर्डी ग्रामपंचायत
- प्रभाग क्रमांक एक- मारुती केरबा बोराडे, मंदा शांताराम शेंडकर
- प्रभाग क्रमांक दोन- सुनिल भैरु पवार, सुमन उत्तम भांडवलकर
- प्रभाग क्रमांक तीन- धनाजी महादेव भांडवलकर.,सुनीता तानाजी बोऱ्हाडे
८) पांडेश्वर ग्रामपंचायत
- सुवर्णा गोरख रोमण