किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) - किल्ल्याची सफर करताना निगडी येथील दृष्टिहीन पर्यटक.
किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) - किल्ल्याची सफर करताना निगडी येथील दृष्टिहीन पर्यटक. 
पुणे

दृष्टिहीनांनी अनुभवली किल्ले शिवनेरीची सफर

सकाळवृत्तसेवा

आपटाळे - शिवजयंती दोन दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राज्यातील विविध भागातून पर्यटकांची पावले छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीकडे वळू लागली आहेत. शिवरायांच्या स्वराज्याचे वैभव दृष्टी नसल्यामुळे पाहता येत नसल्याची खंत न बाळगता निगडी येथील सुमारे १७ दृष्टिहिनांनी आपल्या मनचक्षूने आज किल्ले शिवनेरीवर सफर करत जाज्वल्य इतिहास अनुभवला.

शिवनेरीच्या सफरीमध्ये रामहरी भोसले, चंद्रकांत गायकवाड. प्रियांका भोसले, प्रेरणा गायकवाड, रूपाली गायकवाड, विनायक भोसले, सुनील सूर्यवंशी, राजू बानमारे, अनिता इंगवले यांसह अन्य दृष्टिहीन पर्यटकांचा सहभाग घेतला. निगडी येथील नेत्रहीन कल्याणकारी संघटनेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. जालिंदर राणे यांनी नियोजन केले, तर जुन्नर येथील ज्ञानेश कुटे यांनी गडाची माहिती दिली. 

किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या सुधारणांमुळे सुटीच्या दिवशी पर्यटकांचा ओघ वाढत चालला असून, दर रविवारी गर्दीचा उच्चांक वाढतच आहे. पर्यटकांनी किल्ले शिवनेरीचे पावित्र्य राखावे तसेच गडावर कचरा व विघातक कृत्य होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : नसीम खान असणार काँग्रेसचे स्टार प्रचारक

SCROLL FOR NEXT