bus-.jpg
bus-.jpg 
पुणे

पुण्यात शॅाक सर्किटमुळे बस पेटली

सकाळवृत्तसेवा

पुणे :  संचेती हॉस्पिटलजवळील पूल...दुपारचे तीन वाजून 50 मिनिटे झाली होती....विश्रांतवाडीवरुन कोथरूड डेपोच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसमधून धूर निघू लागला अन्‌ अचानक बसने पेट घेतला...बस चालकाने पोत्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण, हे प्रयत्न अयशस्वी ठरले...प्रसंगावधान राखत बसचालक-वाहकाने प्रवाशांना खाली उतरवले....अन् क्षणार्धात मोकळ्या बसने संपूर्ण पेट घेतला...यावेळी चालक-वाहकाने दाखविलेल्या तत्परतेचे प्रवाशांनी कौतुक केले.

विश्रांतवाडी बसस्थानकावरून पीएमपी बस दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी कोथरूडच्या दिशेने निघाली. पण, संचेती जवळील पुलावर येताच बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालक शंकर हिंगमिरे यांच्या लक्षात आले. वाहक प्रकाश चव्हाण यांच्या मदतीने त्यांनी प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यानंतर बसमध्ये आगीच्या ज्वाळा उसळल्या. त्यांनी तातडीने पोलिस आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशामक दलाच्या पथकाने सुमारे दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आग विझविली. वर्दळीच्या पुलावर बस पेटल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. शॉटसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज अग्निशमन दलाच्या पथकाने वर्तविला. या बाबत वाहक चव्हाण म्हणाले,""इतक्‍या वर्षांपासून मी वाहक म्हणून काम करतोय. पण, अशी घटना पहिल्यांदाच अनुभवली. समाधान आहे की, मी प्रवाशांचे प्राण वाचवू शकलो. आम्ही आमचे कर्तव्य बजावले.'' 
 
"इंजिनमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. विश्रांमवाडीवरुन येताना बस नॉर्मल होती. पण, संचेती पुलावर बसमधून धूर निघू लागला आणि आग लागली. प्रवाशांना खाली उतरवून अग्निशामक दलाला आणि पोलिसांना फोन केला. मी गेल्या तीन वर्षापासून पीएमपीएमएलमध्ये चालक म्हणून काम करतोय. बसने पूलावरच पेट घेतल्याने बसला सुरक्षितस्थळी नेता आले नाही.'' 
- शंकर हिंगमिरे, चालक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT