Cancel electricity bill fixed size during lockdown.jpg 
पुणे

लॉकडाऊन काळातील वीज बिल स्थिर आकार करा रद्द: ही आहेत कारणे...

सकाळवृत्तसेवा

पुणे : वीज ग्राहकाने वीज जोडणी घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या वीज बिलात त्याच्या जोडभारानुसार आयोगाने मंजूर केलेल्या दराने किमान काही रक्कम स्थिर आकार म्हणून आकारली जाते. मात्र, करोना प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने देशभरातील उद्योग गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत. हा बंद शासन आदेशाने करावा लागत असल्याने या कालावधीत स्थिर आकार लावण्यात येऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय सदस्य सूर्यकांत पाठक यांनी केली आहे. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा
 
गुजरात व कर्नाटक शासनाने त्यांच्या राज्यातील व्यापारी व औद्योगिक वीज ग्राहकांच्या लॉकडाऊन कालावधीतील स्थिर आकार रद््द (माफ) केला आहे. असा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने करावा, अशी मागणी गेल्या महिनाभरापासून सर्व औद्योगिक संघटनांनी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वारंवार राज्य शासनाकडे केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जामंत्री, सर्व पालकमंत्री यांना अनेक वेळा ई-मेल, ट्विटर यावर निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सूर्यकांत पाठक म्हणाले, एखाद्या महिन्यात वीज ग्राहकांचा वीज वापर शून्य असेल, तरीही हा स्थिर आकार भरणे अनिवार्य असते. वीज कंपनीने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधा व विशिष्ट जोडभार त्या ग्राहकासाठी आरक्षित होत असल्याने ही आकारणी योग्य आहे. व्यापार व औद्योगिक वीज ग्राहकाचा जोडभार खूप मोठा असल्याने त्यांच्या बीलातील स्थिर आकाराच्या रकमा देखील मोठया असतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात हा आकार माफ करणे गरजेचे आहे. 

ते पुढे म्हणाले, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचा स्थिर आकार स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे. पण स्थगित केलेला आकार तीन महिन्यांनंतर भरावा लागेल. हा भुर्दंड उद्योग क्षेत्रास पेलणे शक्य नसल्याने हा आकार रद््द करावा. तसेच व्यापारी आस्थापने बंद असल्याने वीज वापरही बंद आहेत, त्यामुळे अव्हरेज रिडिंगही त्या महिन्यांसाठी घेण्यात येऊ नये, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूड संदर्भात महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT