esakal | पुण्यात 'कोथरूड'च्या विषयावर महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

murlidhar mohol

महापौर म्हणाले, "सध्याची वेळ ही कोरोनाविरोधात लढण्याची असून, ही लढाई जिंकण्यासाठी पुणेकरांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे.मात्र,त्यावरून राजकारण करीत काही लोकांत भीती पसरवत आहेत.

पुण्यात 'कोथरूड'च्या विषयावर महापौर मोहोळ यांचा मोठा खुलासा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोथरुडसह संपूर्ण पुणे शहर सुरक्षित ठेवण्यासाठी पहिल्या दिवसापासून कठोर उपाय करीत आहोत. ज्या भागांत कोरोनाचे रुग्ण नाहीत आणि जिथे रुग्ण कुठे आहेत; त्या परिसरांत निराळ्या उपाययोजना आहेत. तेव्हा कोथरुडमध्ये अन्य भागांतील म्हणजे, रेड झोनमधील रहिवाशांना आणण्याचा प्रश्नच नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मात्र, अशा मुद्यांवरून राजकारण करू नये, कोथरुडकरांत भीतीचे वातावरण निर्माण करू नये, अशी अपेक्षाही महापौरांनी व्यक्त केली आहे. कोथरुडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला तरी त्याला हॉस्पिटलमध्येच हलविले जाते; मग अन्य भागातील लोकांना येथे का आणले जाईल, याकडेही महापौरांनी कोथरुडकरांचे लक्ष वेधले आहे. 

आणखी वाचा - रेड झोनमधील नागरिकांना कोथरूडकरांचा विरोध?

पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक झाली आहे. त्यात काही भवानी पेठ, ढोले-पाटील रस्ता, कसबा, घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्या-त्या भागांतील रुग्णांच्या प्रमाणात रेड, ऑरेन्ज आणि ग्रीन असे तीन झोन करण्यात आले असून, त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

पुणे कॅन्टोन्मेंट क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या रोखणार? वाचा सविस्तर...

दरम्यान, मध्यवर्ती भागांतील लोकसंख्येचा भार हालका करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. त्यात लोकांच्या इच्छेनुसार निवारागृहांची सोयही केली आहे. तेव्हाच, रेड झोनमधील रहिवाशांना कोथरुड आणि अन्य परिसरात ठेवले जाण्याची चर्चा सुरू असल्याचे पुणे महापालिकेच्या वर्तुळातून सांगण्यात आले आहे. त्यावरून कोथरुडमध्ये स्थानिक राजकारणाला सुरवात झाली आहे. एकीकडे महापालिकेची यंत्रणा कोरोनाचा सामान करीत असताना दुसरीकडे राजकारण सुरू असल्याने आश्च र्य व्यक्त होत आहे. या पार्श्वाभूमीवर महापौर मोहोळ यांनी आपली भूमिका मांडत "रेड झोन'मधील रहिवाशांना इतरत्र हलविण्याचे नियोजन नाही, असे महापौरांनी मंगळवारी सायंकाळी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापौर मोहोळ म्हणाले, "सध्याची वेळ ही कोरोनाविरोधात लढण्याची असून, ही लढाई जिंकण्यासाठी पुणेकरांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. मात्र, त्यावरून राजकारण करीत काही लोकांत भीती पसरवत आहेत. सर्व पुणेकर आणि कोथरुडकरांची गैरसोय होईल, असे कोणतेही पावले उचलली जाणार नाहीत. प्रत्येकाच्या आरोग्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे राजकारण करण्याची ही वेळ नाही. याचे भान राखले पाहिजे. ''

loading image