car container accident one killed 9 injured police hospital
car container accident one killed 9 injured police hospital Sakal
पुणे

Goa Accident News : गोवा बॉर्डर वर कार कंटेनरची धडक, एकाचा मृत्य, ९ जखमी

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : गोवा मधील परणेम येथील पत्रादेवी गोवा पोलीस चेक पोस्ट समोर कार कंटेनरला धडकल्याने एक जण मृत्यूमुखी पडले तर नऊ जण जखमी झाले. हे सर्व जण वाघोली परिसरातील असल्याचे समजते. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

जखमीवर गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी मध्ये पाच बालकांचा समावेश आहे. कांतीलाल विठ्ठल शिंदे ( वय ४७, रा वाडेबोल्हाई ) असे मृत्यू मुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या अपघातात वाघोली येथील श्रीराम तुकाराम बनकर ( वय ३२, रा, वाघोली ) हा चालक जखमी झाला  आहे. प्रवीण बळीराम दशदे ( वय 11 ),

बळीराम दिगंबर दशदे, मनीषा बळीराम दशदे ( वय 30 ), प्रतिभा बळीराम दशदे (वय ११ ), प्रिया बळीराम दशदे ( वय १२ ), ओमकेश्वर चंदकांत डोईवड ( वय २१ ), विनायक राम बनकर (वय ६ ), पपिता राम बनकर (वय 30 ), प्रजिली राम बनकर ( वय १० ) हे प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर गोवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ते वाघोली परिसरातील असल्याचे कळते. गोवा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती इको कार मध्ये हे १० जण होते. कारने प्रथम दोन दुचाकीलाही धडक दिली. नंतर कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात शिंदे यांचा मृत्यु झाला. इतर नऊ जण गंभीर जखमी झाले . जखमी दोन कुटुंबातील आहेत. कार शिंदे यांच्या मालकीची आहे. गोवा पोलीसांनी चालक बनकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे यांचे नातेवाईक गोवा येथे पोहचले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT