mla raja bhaiya raghuraj pratap sinh
mla raja bhaiya raghuraj pratap sinh sakal
पुणे

MLA Raja Bhaiya : ‘छत्रपती शिवाजी महाराज, देशाचा वारसा, प्रेरणास्त्रोत’

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला - ‘सनातन हिंदू धर्म हा काळ्या कालखंडातून जात होता. त्यावेळी चारही दिशांना अंधार पसरला होता. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी आशेचा किरण होते. अत्यंत विषम परिस्थितीत त्यांनी कोणत्याही साधनांशिवाय शून्यातून सुरुवात करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

आपल्या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच प्रेरणास्त्रोत आहेत. त्यामुळे ते फक्त महाराष्ट्राचा नाही तर, संपूर्ण देशाचा वारसा आहे.’ असे मत उत्तरप्रदेशचे माजी मंत्री व आमदार रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैया यांनी सिंहगडावर बोलताना व्यक्त केले.

राजा भैया त्यांचे दोन मुले शिवराज सिंग, ब्रिजराज सिंग व मित्र सोबत सिंहगडावर आले होते. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्मारक येथे नतमस्तक झाले. समाधीला हार अर्पण करून प्रदक्षिणा घातली. श्री कोंढाणेश्वराचे दर्शन घेतले. तानाजी कडा येथे जाऊन पाहणी केली. पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन वाघ, माजी उपसरपंच अमोल पढेर, सरपंच मोनिका पढेर यांनी त्यांना सरकारी कार्यक्रमात त्यांना घेऊन आले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे आयोजित विध्यार्थ्यांच्या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी झाले. येथे त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यांचे हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. यावेळी ते बोलत होते. पांडुरंग सुपेकर, विश्वनाथ मुजुमले, नितीन वाघ, संतोष शेलार, सुशांत खिरीड यांनी स्वागत केले.

राजाभैय्या म्हणाले, माझ्या आईने मला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. तेव्हापासून घरातील देव्हाऱ्यात महाराजांची मूर्ती ठेवली आहे. दररोज त्याची नित्य नियमाने पूजा करतो. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याचे आवाहन केले. मुलांनी पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करू नये.

आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर करून तिचे रक्षण करावे. त्यांनी १५- २० वर्षापूर्वी सिंहगडावर आलो होतो. त्यानंतर आज आलो आहे. गडावर चांगला बदल झाला आहे. शिवरायांच्या अनेक गड किल्ले पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT