पुणे

इमारतीच्या पायऱ्यांवरून कोसळून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पायऱ्यांवरुन कोसळलेल्या चार वर्षांच्या मुलास डोक्‍याला मार लागल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यु झाला. ही घटना नऱ्हे परिसरात घडली. 

अनुराग पुरू (वय 4 रा. नऱ्हे, मुळ रा. झारखंड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुरागचे वडील मजुरीचे काम करतात. बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणीच ते राहात होते. नऱ्हे येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. तेथेच अनुरागचे आई-वडील राहात होते. सहा दिवसांपुर्वी त्याचे वडील कामासाठी बाहेर गेले होते. तर आई धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेली होती. तेव्हा अनुराग आईच्या पाठीमागे जात होता. जिन्याच्या पायऱ्या चढत असतानाच दुसऱ्या पायरीवरुन तो खाली कोसळला.

त्यास कोणत्याही प्रकारची दुखापत झाली, नाही मात्र तो बेशुद्ध पडला. त्यामुळे त्यास तत्काळ कात्रज परिसरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार केल्यानंतर ससूनला हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यु झाला. जिन्यावरुन पडल्यानंतर डोक्‍याच्या अंतर्गत भागात मार बसल्यामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे शवविच्छेदनामध्ये उघडकीस आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT