निगडी, प्राधिकरण - पारंपरिक खेळ खेळताना मुले.
निगडी, प्राधिकरण - पारंपरिक खेळ खेळताना मुले. 
पुणे

अंगणातील खेळात रमली मुले

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं... आम्हाला नाही सापडलं...’ किंवा ‘सांगा बघू मी कोण? गणपती की मारुती?’ असे सांघिक खेळ तेही अंगणात किंवा गल्लीत बसून वयाची तिशी ओलांडलेली पिढी बालपणी हमखास खेळली आहेत. आता मात्र मोबाईल आणि संगणकाच्या युगात हे चित्र दुर्मीळ झाले आहे. सारे खेळ एकट्याने किंवा दोघांनी मिळून हातातील ‘की-पॅड’द्वारे खेळले जाणारे आहेत. यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना विनाखर्चिक जुन्या सांघिक खेळांचा आनंद देण्याचा प्रयत्न प्राधिकरणात झाला. या खेळांमध्येही नवीन पिढीतील मुले रमली आणि त्यांच्या पालकांना स्वतःचे बालपण आठवले. 

श्री केदारेश्‍वर समाज विकास ट्रस्ट आणि चक्रव्यूह मित्र मंडळ यांच्या माध्यमातून निगडी-प्राधिकरणातील पेठ २४ मधील श्री केदारेश्‍वर मंदिराच्या प्रांगणात हे खेळ रंगले. पूर्वीच्या काळी अंगणात खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांत सुमारे ४५ मुले उत्साहाने सहभागी झाले. आधुनिक, महागडी खेळणी कटाक्षाने टाळून फक्त ग्रामीण संस्कृतीतील जुन्या आणि बिनखर्चाच्या खेळांना कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत संयोजक साशंक होते. परंतु, प्रारंभीच ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ असे दमदार जयघोष करीत मुले हिरिरीने खेळांमध्ये समरस झाली. 

फावल्या वेळात टीव्हीपुढे चिकटून बसणारी किंवा मोबाईलवर गेम खेळणारी मुले अखंड दोन तास भान विसरून खेळताना पाहून पालकांनी उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. त्यानंतर दमलेल्या मुलांनी ओलीभेळ, चनाभेळ आणि पाणीपुरी या आवडत्या पदार्थांवर यथेच्छ ताव मारला. सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे, राजू मोरे यांच्यासह पेठ क्रमांक २४ मधील महिलांनी संयोजन केले. शीतल कापशीकर यांनी खेळांचे सूत्रसंचालन केले. श्री केदारेश्‍वराच्या सामुदायिक आरतीने समारोप झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT