Corona-Danger 
पुणे

चीनचा प्रवासी पुण्यातील रुग्णालयात दाखल

सकाळवृत्तसेवा

पुणे - भारतात दहा दिवसांपूर्वी आलेल्या एका चिनी नागरिकाला कोरोना विषाणूंची लक्षणे दिसल्याने पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात शुक्रवारी ठेवण्यात आले. ली सियोन असे त्याचे नाव असून, दिल्ली येथून पुण्याकडे येणाऱ्या विमानाने तो प्रवास करत होता. 

दिल्लीहून १७७ प्रवाशांना घेऊन पुण्याकडे जाण्यासाठी विमानाने सकाळी उड्डाण केले, त्या वेळी ली सियोनला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला उलट्या झाल्या. तो चीनचा नागरिक असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पुणे विमानतळावर उतरल्यानंतर त्याला तातडीने डॉ. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. याबाबत महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे म्हणाले, ‘‘ली सियोनला विमानात त्रास झाल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या घशातील द्रवपदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविले असून, अहवाल शनिवारपर्यंत (ता. ८) मिळेल. त्यानंतरच त्याला नेमके काय झाले, हे स्पष्ट होईल.’

ली सियोन हा दहा दिवसांपूर्वी चीनमधून भारतात आला आहे. यादरम्यान तो कोलकता, भुवनेश्वर, दिल्ली या शहरांमधून फिरून आता पुणे येथे उतरला असल्याची माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. 

पुण्यात एकही रुग्ण नाही
डॉ. नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात सात खाटा कोरोना विषाणूंच्या संसर्गासाठी राखीव ठेवल्या आहेत. पुण्यात आतापर्यंत दाखल केलेल्या नऊ रुग्णांचे दोन्ही नमुने ‘निगेटिव्ह’ आले आहेत, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडले. कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या भागातून प्रवास करून आलेल्या दोन प्रवाशांना गुरुवारी (ता. ६) संध्याकाळी डॉ. नायडू रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल केले. त्यानंतर शुक्रवारी (ता. ७) सकाळी चीनच्या नागरिकाला कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर दाखल केले, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ग्रामीणमधील नववी-दहावीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी 3 शिक्षक; शहरांमधील 300 शाळांना लावावे लागणार कुलूप; प्रत्येक वर्गात 20 पटसंख्येची अट

Panchang 18 May 2026 : पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रदर्शन आणि सर्वार्थसिद्धी योग माहिती

भन्नाट योजना! बारावी, आयटीआय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना ११ महिने नोकरीपूर्व प्रशिक्षण; दरमहा मिळतील ६,००० ते १०,००० रुपये

आजचे राशिभविष्य - १८ मे २०२६

प्रोटीन, फायबर आणि चवीचा जबरदस्त कॉम्बो! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दुधी-चणा डाळ पराठा

SCROLL FOR NEXT