‘कोरोना’वर आता कोण ठेवणार लक्ष पहा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

‘डीएनए’चे संकलन
जोखमीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जवानांच्या ‘डीएनए’चे नमुने जमा केले जाणार आहेत. ते एएफएमसीमध्ये जपून ठेवण्यात येणार आहे. युद्ध कारवाई किंवा विमान अपघातादरम्यान कोणताही जवान हुतात्मा झाल्यास त्या जवानाची ओळख पटविण्यासाठी या ‘डीएनए’चा वापर केला जाईल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सियाचिन, पाणबुडी, लढाऊ विमान, जहाज, अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या जवानांचे ‘डीएनए’चे नमुने गोळा करण्यात येणार आहेत.

पुणे - ‘कोरोना विषाणूंच्या संदर्भातील प्रादुर्भाव किंवा संशयित नमुन्यांची वैद्यकीय चाचणी व तपासणी लष्करी वैद्यकीय सेवेच्या दहा प्रयोगशाळांमध्ये केली जाणार आहे. चीनमधून आलेल्या भारतीय नागरिकांची जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार तपासणी केली जात आहे,’’ अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे (एएफएमएस) महासंचालक लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील लष्करी महाविद्यालयात गुरुवारी (ता. ६) वार्षिक लष्करी वैद्यकीय परिषद आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नरदीप नैथानी, अधिष्ठाता मेजर जनरल आर. एम. गुप्ता उपस्थित होते. 

बॅनर्जी म्हणाले, ‘‘कोरोना विषाणू संदर्भातील नमुन्यांची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित रुग्णालयांना देऊन पुढील उपचारावर भर दिला जाईल. यासाठी एम्स, एनआयबीएम सारख्या संस्थांची मदत घेतली जाईल. सध्या लष्कराकडूनही खबरदारी घेतली आहे. यासाठी हरियानाच्या मानेसरजवळ विशेष विभागाची सुविधा दिली आहे.’’

पेरूचा भाव कमी न केल्याने विक्रेत्यावर चाकूने वार

लष्कराच्या तिन्ही दलांच्या वैद्यकीय सेवा ‘टेलिमेडिसीन’सारख्या पद्धतीचा वापर करत आहेत. ज्या जवानांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाता येत नाही. तेव्हा टेलिमेडिसीन हा उत्तम पर्याय असतो. ईशान्य भारतात सुमारे ६० अशा रुग्णालयाच्या साह्याने ही उपचार प्रणाली वापरली जात आहे. एएफएमएसीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि संशोधन पत्रांना पुरस्कार दिले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Take a look at who now holds the corona virus