पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली चालायचे सेक्स रॅकेट; पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

पुण्यातील कोंढवा परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सुरवातीला खातरजमा केली. त्यानंतर धाड टाकून पाच तरुण मुलींची सुटका केली. तर मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 69 वर्षीय मॅनेजरला पोलिसांनी अटक केली.

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सुरवातीला खातरजमा केली. त्यानंतर धाड टाकून पाच तरुण मुलींची सुटका केली. तर मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या 69 वर्षीय मॅनेजरला पोलिसांनी अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा एनआयबीएम रोडवरील यंग स्पा सेंटर याठिकाणी मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाला त्या ठिकाणी पाठवून सापळा रचला. त्यानुसार येथील मॅनेजर नवीन शहा याने पैसे स्वीकारून या बनावट ग्राहकाला आत सोडले. त्यानंतर या बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे मिसकॉल देऊन इतरांना याविषयी माहिती दिली. इतर पोलिसांनी त्यानंतर त्या ठिकाणी धाड टाकली.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

यावेळी त्यांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच तरुण मुलींची सुटका केली. या मुलींकडे केलेल्या अधिक चौकशीत अंकित नवीन शहा याच्या मालकीचा हा स्पा असल्याचे उघड निष्पन्न झाले. तर 69 वर्षीय नवीन शहा याठिकाणी मॅनेजर म्हणून कामकाज पहात होता.  पोलिसांनी नवीन शहा याला अटक केली तर अंकित शहा याचा शोध सुरू आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex racket under the name of massage center in pune