lock down 
पुणे

हवेलीकरांनो, पुणे आणि पिपरी चिंचवडला जाण्यापूर्वी हे वाचा...  

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेलीकरांनो, पुण्यात अथवा पिपंरी चिचवड शहरात येणार असाल, तर या पुढील काळात तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन एक हमीपत्र लिहून द्यावे लागणार आहे. 

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कामानिमित्त या शहरात येजा करणाऱ्यांपासून हवेलीमधील नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी हवेली पंचायत समितीने वरील फर्मान काढले आहे. पुणे शहरालगतच्या हवेली तालुक्यातील नव्वद ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांकडून हमीपत्र लिहून घेणार आहे. 

याबाबत हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी माहिती दिली की, हवेली तालुक्यात मागिल तीन महिन्यांच्या काळात अडीचशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील दिडशेहून अधिक रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत. मात्र, मागिल काही दिवसांपासून हवेली तालुक्यातील पुणे शहरालगतच्या गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण लक्षणियरित्या वाढल्याचे दिसून येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांत आढळून आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला असता, नव्वद टक्के रुग्ण हे पुणे व पिंपरी चिंचवड शहरात येजा करणारे अथवा येजा करणाऱ्यांच्या संपर्कात आलेले असल्याचे आढळून आले आहे. या शहरांत कामानिमित्त येजा करणारे अनेक नागरिक आहेत. त्यांना येजा करण्यापासून रोखु शकत नाही. मात्र, त्यांच्याकडून हवेलीत कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घेण्याची हमी तर घेऊ शकतो. यातुनच या पुढील काळात हवेलीकरांना पुण्यात येजा करण्यासाठी हमीपत्र लिहून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे शिर्के यांनी सांगितले. 


याबाबत हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी सांगितले की, हवेली तालुक्यातील हजारो नागरिक कामानिमित्त पुणे व पिंपरी चिंचवड शहरात येजा करतात. त्यांच्याकडून कामावर जाताना कापडी रुमाल अथवा मास्क वापरणार, सॅनिटायझर सोबत ठेवणार व त्याचा वारंवार वापर करणार, सार्वजनीक ठिकाणी थुंकणार नाही, घराबाहेर पडल्यापासून पुन्हा घरी येईपर्यंत स्वच्छतेचे सर्व नियम पाळणार, सोशल डिस्टन्स पाळणार, अशा विविध सूचना पाळण्याबाबतचे हमीपत्र लिहुन घेतले जाणार आहे. त्यातुनही कोणी या सूचनांचा अनादर करत असल्याचे लक्षात आल्यास पोलिसांच्या माध्यमातून योग्य ती समज दिली जाणार आहे. त्यातून कोरोनाचे रुग्ण कमी व्हावेत, हाच हेतू असुन, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

याबाबतची हमी द्यावी लागणार
 - कामावर जाताना कापडी रुमाल अथवा मास्क वापरणार
 - सॅनिटायझर सोबत ठेवणार व त्याचा वारंवार वापर करणार
 - सार्वजनीक ठिकाणी थुंकणार नाही  
 - घराबाहेर पडल्यापासून पुन्हा घरी येईपर्यंत स्वच्छतेचे सर्व नियम पाळणार
 - सोशल डिस्टन्स पाळणार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT