आदिवासी भागातील पूजा शिवाजी भोईरची झाली तहसिलदार पदी निवड

पराग जगताप
Wednesday, 24 June 2020

पूजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विटा जि.सांगली येथे झाले तर, पदवीचे अवसरी (ता.आंबेगाव) तर पुण्यात पदवित्तर शिक्षण झाले. राज्य सेवा आयोग परिक्षेची तयारी पूजाने पुणे युसिटीच्या लायब्रेरीमध्ये दहा ते बारा तासा पेक्षा जास्त वेळ अभ्यास करून केले. 

जुन्नर: पिंपळगाव जोगा (ता.जुन्नर) येथील भोईरवाडीमधील पूजा शिवाजी भोईर या आदिवासी भागातील मूलीने तहसिलदार पदाची परीक्षा पास होऊन परिसराचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मुळ जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील भोईरवाडी मधील पूजा हिचे वडिल शिवाजी रामभाऊ भोईर हे नोकरी निमित्त सांगली येथे स्थायिक असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत तर, पूजाची आई आशा ह्या गृहीणी आहेत. पूजाला प्रतिक व ऋतीक हे दोन भाऊ असून प्रतिक ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात एस.वाय.बी.एचे शिक्षण घेत आहे तर ऋतीक हा कोल्हापूर येथे बी.एस्सी.अॅग्रीचे  शिक्षण घेत आहे. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार
 

शिवाजी भोईर यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यानी स्व:ताच खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यामूळे त्यांनी मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्व दिले.पूजाने आय.ए.एस. अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा आहे तर, पूजाच्या आई आशा भोईर यांनी पूजाच्या अभ्यासाकडे दहावीपासूनच विशेष लक्ष दिले असून आज तीने तहसिलदारपदी नियुक्त झाल्याने माझे स्वप्न पूर्ण केले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक; जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम

पूजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विटा जि.सांगली येथे झाले तर, पदवीचे अवसरी (ता.आंबेगाव) तर पुण्यात पदवित्तर शिक्षण झाले. राज्य सेवा आयोग परिक्षेची तयारी पूजाने पुणे युसिटीच्या लायब्रेरीमध्ये दहा ते बारा तासा पेक्षा जास्त वेळ अभ्यास करून केले. पूजाचा दिनक्रम सकाळी सात वाजेपासून लायब्रित जाऊन अभ्यास सुरु करायचा ते रात्री नऊ ते दहा वाजे पर्यंत तेथेच जेवन नाश्ता सर्व तेथेच करत असे.पूजा तहसिलदार पदावरच न थांबता पूढे अभ्यास सुरु ठेवून तिला डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर व्हायचे आहे.

तहसिलदारपदी निवड झाल्या बद्दल पूजा व तीच्या आई वडिलांचा पिंपळगाव जोगा डिंगोरे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अंकुश आमले, माजी.जि.प.सदस्य बबन तांबे, आदिवासी नेते बुधाजी शिंगाडे, पिंपळगाव जोगाच्या सरपंच शितल भोईर, उपसरपंच दादासाहेब हांडे, भगवान हांडे, नवनाथ सुकाळे, पंकज हांडे, माऊली सस्ते, दिलीप कदम, निलेश हांडे, राहुल सुकाळे, सुरेश हांडे, अजित घाडगे, सुरेश भोईर, गणेश शिरसाठ यांनी व इतरांनी भोईरवाडी येथील त्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करुन सत्कार केला. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी फोनवर पूजाचे अभिनंदन केले.

सोबत विडिओ व सत्काराचा फोटो......


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pooja Shivaji Bhoir from tribal area was elected as Tehsildar