पुणे : दिग्दर्शक ऋत्विक घटक यांचे निकटचे सहकारी महेंद्र कुमार यांच्या वैयक्तिक संग्रहालयातील फिल्म्स आणि चित्रपटविषयक इतर साहित्याचा मोठा खजिना पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे.
'स्टील फोटोग्राफर' महेंद्र कुमार यांनी अनेक वर्षे दिग्दर्शक ऋत्विक घटक यांच्याकडे असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम केले होते. त्यावेळी त्यांच्या वैयक्तिक संग्रहालयात सेल्युलाइड फिल्म्सची रिळे, ३५ एमएम कलर्स पॉजिटीव्ह स्लाईड्स, कृष्णधवल निगेटिव्हच्या स्ट्रीप्स, पोस्टर्स, कॅमेरे, फिल्म्स रोल्स, तसेच असंख्य सीडी, डीव्हीडी, हस्तलिखिते, पुस्तके, जर्नल्स. आणि इतर चित्रपटविषयक दुर्मिळ साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. कोलकाता येथील 'सेंटर फॉर स्टडीज अँड सोशल सायन्सेस' या ठिकाणी असलेले हे सर्व साहित्य चांगले जतन होण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे हस्तांतर करण्यात आले आहे.
महेंद्र कुमार यांनी अनेक गोष्टींचा संग्रह केला होता. तो संग्रह महेंद्र कुमार त्यांनी २०१७ साली 'सीएसएसएस' ला दिला होता. मात्र 'सीएसएसएस' कडे हे सर्व साहित्य जतन करण्याची अत्याधुनिक सोय नसल्यामुळे सर्व साहित्य राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय घेतला असे सांगून 'सीएसएसएस' च्या संचालिका रोसिका चौधरी यांनी, सांगितले.
'सामग्रीतील संख्या मोठ्या असल्यामुळे त्याची सामग्री विशेषतः फिल्म रील्सची सूची आणि तपासणी केली जाईल. असे, एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. या संग्रहात सुमारे सोळाशेहून अधिक छायाचित्रे, २३०० कलर पॉजिटीव्ह स्लाईड फिल्म्स, ३५० निगेटिव्ह फिल्म्सच्या स्ट्रीप्स तसेच असंख्य फिल्म्स रिळे आहेत. तसेच १९३० मधील दुर्मिळ छायाचित्रे आहेत. महेंद्र कुमार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून काढलेली, सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उदय शंकर आणि त्यांच्या नृत्य पथकातील काही दुर्मिळ नृत्याची छायाचित्रेही त्यामध्ये. तसेच ऋत्विक घटक यांच्या 'नागरिक', 'सुवर्णरेखा', आणि 'टिटास एकटी नादीर नाम' या चित्रपटातील काही दुर्मिळ छायाचित्रेही या संग्रहात आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.