0coriader
0coriader 
पुणे

कोथिंबिरीच्या दहा हजार जुड्या फेकल्या

ravindra pate

शेकडा 100 रुपये भाव; 10 हजार जुड्या फेकून देण्याची वेळ 

नारायणगाव (पुणे) : कोथिंबीर, मेथीचे भाव घसरल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात गुरुवारी (ता. 1) रात्री झालेल्या लिलावात कोथिंबीर, मेथीच्या जुडीला एक ते पाच रुपयांदरम्यान भाव मिळाला. भाव नसल्याने उपबाजार आवारात सुमारे दहा हजार जुड्या फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. गेले दोन महिने कोथिंबीर, मेथीला येथील उपबाजारात सोन्याचा भाव मिळाला होता. 


येथील उपबाजारात दररोज टोमॅटो, कोथिंबीर, मेथीचे लिलाव होतात. पाणीटंचाईमुळे या वर्षी जून, जुलैमध्ये कोथिंबीर, मेथीच्या जुडीला शेकडा दोन हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे काही शेतकरी मालामाल झाले. मात्र, श्रावण महिना सुरू होताच कोथिंबीर व मेथीचे भाव घसरले.

जून, जुलैमध्ये सोन्याचा भाव मिळालेली कोथिंबीर व मेथी मातीमोल झाली. येथील उपबाजारात गुरुवारी (ता. 1) कोथिंबीर, मेथीच्या 1 लाख 25 हजार जुड्यांची आवक झाली. जुडीला शेकडा शंभर ते पाचशे रुपये भाव मिळाला. या भावात शेतकऱ्यांचा वाहतूक व काढणी मजुरीचा खर्चही वसूल झाला नाही. 

टोमॅटोची आवक घटली 
मागील पाच- सहा दिवसांपासून पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण आहे. यामुळे टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटले आहे. झालेली लागवड पाहता उपबाजारात किमान एक लाख क्रेटची आवक होणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या रोज वीस ते पंचवीस हजार टोमॅटो क्रेटची आवक होत आहे. टोमॅटो क्रेटला (वीस किलो) प्रतवारीनुसार चारशे ते पाचशे रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. या वर्षी टोमॅटोला चांगला भाव आहे, मात्र उत्पादनात घट झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT