Corona-Virus
Corona-Virus 
पुणे

शिरूर तालुक्यात कोरोनाने माजविला पुन्हा कहर

नितीन बारवकर

शिरूर - शिरूर शहरासह तालुक्यात कोरोनाने आज पुन्हा कहर माजविला असून, तालुक्यात आज दिवसभरात वीस जणांना संसर्ग झाला. त्यातच दोघा बाधित ज्येष्ठांचा मृत्यु झाल्याने तालुका हादरला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या महिनाभरापासून शिरूर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून, दररोज सरासरी १५ रूग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल काहीसा दिलासा मिळाला होता. काल चार रूग्ण सापडल्याने कोरोनाची साखळी आवाक्यात आली आहे, असे वाटत असतानाच आज १२ गावांत एकूण वीस जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने़ तसेच धानोरे येथील ७९ वर्षीय ज्येष्ठाचा व सणसवाडी येथील ऐंशी वर्षीय बाधित महिलेचा मृत्यु झाल्याने सामान्य नागरीकांबरोबरच; आरोग्य यंत्रणाही हादरली आहे.

आज दिवसभरात गणेगाव दुमाला येथील तिघांचा, कारेगाव व केंदुर येथील दोघांचा; तर अण्णापूर, मलठण, शिक्रापूर, पाबळ, आपटी, जांबुत, शिरुर ग्रामीण व मांडवगण फराटा येथील प्रत्येकी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. 

शिरूर शहरातील काची आळी परिसरातील ५४ वर्षीय, गुजर मळ्यातील ४१ वर्षीय व यशवंत कॉलनी येथील ४१ वर्षीय पुरूष, भाजीबाजारातील तीस वर्षीय तरूण व कुंभार आळी येथील ४८ वर्षीय सलून व्यावसायिक अशा पाच जणांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने शहरातही घबराट पसरली आहे. यात राजकीय पदाधिका-याचा तसेच मोठा संपर्क असलेल्या व्यावसायिकाचा समावेश असल्याने संपर्क क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. संबंधित रूग्णांच्या संपर्कातील रूग्णांचे स्वॅब टेस्टिंगसाठी पाठविले जाणार असून, त्यांची माहिती घेण्याचे काम चालू असल्याचे व या पाच जणांच्या संपर्कातील ३५ जणांची नोंद केली असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. तुषार पाटील यांनी दिली.

काल दिलासा मिळालेल्या तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या आज पुन्हा झटक्यात वाढल्याने सर्वच क्षेत्रांतून चिंता व्यक्त केली जात आहे. राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासनाला या पार्श्वभूमीवर कडक सूचना दिल्या असून, सामाजिक शिस्तीबाबत पोलिस यंत्रणेला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बाधित रूग्णांच्या संपर्कात आलेले अनेकजण प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करीत नसल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत निदर्शनास आले असून, शहरात अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसविण्याचे प्रकार घडले असल्याने प्रशासनाने याबाबत तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा सामान्य नागरीकांतून व्यक्त होत आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभेचा आज महानिकाल! NDA हॅट्रिक साधणार की INDIA सत्तेत येणार याची उत्कंठा शिगेला

Manoj Jarange: उपोषणाला आता अंतरवलीच्या नागरिकांचाच विरोध! जरांगे म्हणतात, आता मन...

SL vs RSA T20 WC 2024 : आफ्रिकेला 77 धावा करताना फुटला घाम; श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलं टेन्शन

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

SCROLL FOR NEXT