crime_logo
crime_logo 
पुणे

आत्महत्या केलेल्या मृत महिलेवरच फसवणुकीचा गुन्हा 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) : एका मुलाने अनेकांची फसवणूक करून तो पळून गेला. मात्र देणेकऱ्यांनी त्याच्या आईला आणि अपंग मावशीला पैशासाठी त्रास दिला. या त्रासाला कंटाळून दोन सख्ख्या बहिणींनी विष प्राशन केले. त्यापैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून देणेकऱ्यांनी चक्क आत्महत्या केलेल्या मृत महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा अजब प्रकार निगडी येथे घडला आहे.

चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर (वय ३४ रा. त्रिवेणीनगर तळवडे) आणि मंगला गोकुळ नार्वेकर (वय ५५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. प्रविण पर्वतराव मराठे (वय ५० रा. मु.पो. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चंद्रशेखर आणि त्याची आई मंगला यांनी फिर्यादी यांची मुलगी शैलेजा हिला महापालिकेत सहाय्यक पदावर नोकरी लावतो असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून सात लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना प्रशासन अधिकारी, आस्थापना, पिंपरी चिंचवड मनपा, यांची खोटी सही व दस्तावेज तयार करून बनावट नियुक्ती पत्र देऊन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारी फसवणुकीचा गुन्हा निगडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मात्र यातील आरोपी मंगला नार्वेकर यांनी देणेकऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ६ मार्च रोजी आपल्या अपंग बहिणीसह विषप्राशन केले. उपचारादरम्यान रविवारी मंगला नार्वेकर यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी मंगला यांनी सुसाईट नोट लिहिली असून, त्यात त्रास देणाऱ्यांची नावे लिहिली आहेत. त्यानंतर सोमवारी प्रवीण बराटे यांनी चंद्रशेखर नार्वेकर आणि त्याची आई मंगला नार्वेकर यांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT