बारामती- तालुक्यातील गुनवडी येथे हातभट्टीचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला.
बारामती- तालुक्यातील गुनवडी येथे हातभट्टीचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. 
पुणे

बारामतीत हातभट्टीवर मोठी कारवाई

सकाळवृत्तसेवा

बारामती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारुविक्री बंद असल्याने हातभट्टीच्या गावठी दारुचे उत्पादन चोरुन वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. 

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन बारामतीनजिक गुनवडी येथे हातभट्टी दारुची निर्मिती होत होती. त्या नुसार पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार, फौजदार पद्मराज गंपले यांच्या पथकाने छापा मारला असता तेथे मोठ्या प्रमाणावर गावठी दारुचे रसायन सापडले. 

बारामती शहर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत दोनशे लिटरचे सोळा बॅरेल रसायन व तीन लाखांची गावठी दारु व तयार करण्याचे पूरक साहित्य उध्वस्त करण्यात आले. या शिवाय इलेक्ट्रॉनिक् मोटार, वॉटर हिटर आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यान या गावठी दारु तयार करण्यासाठी वीजेचे कनेक्शनही महावितरणची दिशाभूल करुन घेतल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी गौतम तानाजी शिंदे व संतोष अण्णा कांबळे  यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात झालेली शहर पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे नारायण शिरगावकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT