murder of friend
murder of friend sakal
पुणे

पैसे देवाण-घेवाणच्या वादातून मद्यपी मित्रांची मारामारी, एकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

भोर : दोन मद्यपी मित्रांमध्ये पैसे देण्या-घेण्याच्या वादातून झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यु झाला. अक्षय कन्हैया गायकवाड (वय 31, रा. बौध्दनगर एस.टी. स्टँड जवळ) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव असून येथील स्मशानभूमीच्या शेडमध्ये शुक्रवारी (ता.3) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. देवराम लक्ष्मण माने (वय 32, रा. नारायणपूर, ता.पुरंदर) यास पोलिसांनी तीन तासात आरोपीला अटक केली. याबाबत भोर पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मयत अक्षय आणि आरोपी देवराम हे दोघे मित्र असून दोघांनाही दारुचे व्यसन आहे.

शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघेजण स्मशानभूमीच्या शेडमध्ये दारु पीत बसले होते. त्यावेळी अक्षय याने आरोपी देवरामच्या खिशातून 180 रुपये काढून घेतले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे रुपांतर मारामारीत झाले. देवरामने अक्षयच्या छातीवर आणि गुप्तांगावर दगड मारले. त्यामुळे अक्षय विव्हळत पडला आणि आरोपी देवराम पळून गेला. अक्षयचा भाऊ विजय गायकवाड याने त्यास शासकीय़ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना काही वेळातच त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांनी सहका-यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी आरोपीस भोलावडे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ पकडले. आरोपी नारायणपूरला पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रेय खेंगरे, अतुल मोरे, बाळासाहेब नवले, शिवाजी काटे, गणेश कडाळे, प्रियंका जगताप, होमगार्डचे भीमराव रणखांबे व आकाश सागळे यांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. दरम्यान भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांनी भोरला व घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय जगताप करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT