पुणे

काही मिनिटांसाठी हुकली ‘सीटीईटी’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देशातील जवळपास १०४ केंद्रांवर २० भाषांमध्ये रविवारी झाली. मात्र, पुण्यातील केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे उमेदवार दाखल झाले असतानाही त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे या उमेदवारांना ‘सीटीईटी’च्या ‘पेपर-एक’ला मुकावे लागले.

या परीक्षेसाठी देशातील जवळपास २० लाख ८४ हजार १७४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. या परीक्षेतील ‘पेपर-एक’ सकाळी साडेनऊ ते दुपारी बारा आणि ‘पेपर-दोन’ दुपारी दोन ते साडेचार या वेळेत झाला. उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी ९० मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्‍यक असून, ‘पेपर-एक’साठी सकाळी साडेनऊ वाजल्यानंतर आणि ‘पेपर-दोन’साठी दुपारी दोन वाजल्यानंतर केंद्रावर दाखल झाल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी सूचना ‘सीबीएसई’ने यापूर्वीच केली होती. मात्र, परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोचल्याने परीक्षेसाठी प्रवेश देणे आवश्‍यक होते, असे काही उमेदवारांचे म्हणणे आहे.

कर्वेनगर येथील मिलेनियम नॅशनल स्कूलमधील केंद्रावर काही उमेदवार सव्वानऊ ते नऊ वाजून २८ मिनिटांपर्यंत पोचले, त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला गेला नाही. अकोला जिल्ह्यातून पुण्यातील परीक्षा केंद्रावर आलेले मेहबूब शेख म्हणाले, ‘‘मी सकाळी सहा वाजता पुण्यात आलो. केंद्र शोधत-शोधत नऊ वाजून २५ मिनिटांनी केंद्रावर पोचलो, तरी देखील तेथील संबंधित अधिकाऱ्यांनी मला परीक्षेला बसू दिले नसल्याने ‘पेपर-एक’ मला देता आला नाही.’’ साताऱ्यातील म्हसवड येथून आलेल्या वंदना साबळे म्हणाल्या, ‘‘परीक्षा केंद्रावर वेळेत पोचले होते. परंतु, ओळखपत्र राहिल्यामुळे ते आणण्यासाठी केंद्राच्या बाहेर आले. मात्र, त्यानंतर पुन्हा केंद्रात जाण्यासाठी गेले असता मला प्रवेश नाकारण्यात आला.’’ सीटीईटी परीक्षेतील पेपर-एक सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणार होता. त्यापूर्वी केंद्रावर दाखल होऊनही परीक्षेला बसू न दिल्याची तक्रार आणखी काही उमेदवारांनी केली आहे. दरम्यान, याबाबत परीक्षा केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्यासाठी शाळेत संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT