पुणे

युवकाच्या खूनप्रकरणी अल्पवयीन मुले ताब्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील युवकाच्या खूनप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. दारू पिताना पैसे घेण्याच्या कारणामुळे झालेल्या वादातून खून करण्यात आला असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे.

हरी ऊर्फ गुड्ड्या असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवारी (ता. 15) सिंहगड रस्त्यावरील फनटाइम चित्रपटगृहाजवळील बंदिस्त पाइपलाइनमध्ये हरीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास सिंहगड पोलिसांकडून सुरू होता. त्या वेळी मृत व्यक्ती व त्याच्यासमवेत तिघे जण दारू पिण्यासाठी एकत्र आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे चौकशी केली. त्या वेळी तिघांनीच खून केल्याची कबुली दिली. मंगळवारी तिघे जण घटनास्थळी दारू पीत होते. त्या वेळी हरी तेथे दारू पिण्यासाठी आला. त्यांच्यापैकी एकास त्याने दारू आणण्यासाठी पैसे दिले. त्यानुसार एकाने दारू आणून दिली; परंतु उरलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे झाली. त्या वेळी तिघांनी हरीच्या डोक्‍यात दगड घालून त्याचा खून केला.

पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गडकरी, पोलिस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे, पोलिस कर्मचारी दत्ता सोनवणे, दयानंद तेलंगे पाटील, योगेश झेंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT