भरत नाट्य मंदिर - स्पर्धेतील विजेतेपद पटकाविलेल्‍या विद्यार्थ्यांसह मान्यवर.
भरत नाट्य मंदिर - स्पर्धेतील विजेतेपद पटकाविलेल्‍या विद्यार्थ्यांसह मान्यवर. 
पुणे

भालबा करंडकमध्ये दंतकथा नाटिका प्रथम

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रीय कलोपासक व नाट्य संस्कार कला अकादमीच्या वतीने ‘भालबा केळकर करंडक’ या नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वारज्याच्या आर्यन्स वर्ल्ड स्कूलने सादर केलेल्या ‘दंतकथा’ या नाटिकेने प्रथम क्रमांकाचा भालबा केळकर करंडक पटकावला, तर नावीन्यपूर्ण व कल्पक सादरीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या नानासाहेब शिरगोपीकर करंडकावर टॅंगी ट्विस्टर बॉक्‍स ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌सच्या ‘पिनू’ने आपले नाव कोरले.

शुक्रवार (ता. १०) ते रविवार (ता. १२) या कालावधीत ही स्पर्धा भरत नाट्य मंदिरात झाली. यामध्ये पुणे व परिसरातील २७ शाळांनी सहभाग घेतला होता. रवींद्र सातपुते, आश्‍लेषा महाजन आणि प्रसाद भडसावळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता भरत नाट्य मंदिर येथे प्रसिद्ध बालसाहित्यिक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. 

स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कात्रज येथील आर्यन्स वर्ल्ड स्कूलने सादर केलेल्या ‘पक्ष्यांचे कविसंमेलन’ या नाटकाला कृष्णदेव मुळगुंद करंडक, तृतीय क्रमांकावरील शिशू विहार प्राथमिक शाळेला राजाभाऊ नातू करंडक व इतर शाळांना विविध पुरस्कार 
देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT