Ajit Pawar
Ajit Pawar sakal
पुणे

Daund News : शरद पवार यांच्या गुगलीवर अजित पवार यांचा चौकार

प्रफुल्ल भंडारी

दौंड - ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांचे दौंड शहरातील जुने खंदे सहकारी व सध्या भाजपशी जवळीक असणारे दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख किसनदास कटारिया यांची तब्बल सात वर्षांनी भेट घेऊन विरोधकांसाठी गुगली टाकली होती. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गुगलीवर चौकार मारीत प्रेमसुख कटारिया यांच्या घरी भेट घेत त्यांना लोकसभा उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारात सक्रिय करून घेतले आहे.

दौंड नगरपालिकेचे सलग ५० वर्षे नगरसेवक असणारे आणि दोन वेळा दौंड विधानसभा निवडणूक लढविणारे प्रेमसुख कटारिया यांची ७ एप्रिल रोजी दौंड शहरात भेट घेतली होती. शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रेमसुख कटारिया यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली होती.

प्रेमसुख कटारिया हे सध्या कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसले तरी दौंड मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल कुल यांचे तालुक्यातील राजकीय मार्गदर्शक म्हणून मोठी भूमिका बजावत आहेत. दरम्यान १७ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंड शहरात डॅाक्टर व वकिल बांधवांशी एका बैठकीत संवाद साधला.

या बैठकीत अजित पवार यांच्या सुचनेनुसार प्रेमसुख कटारिया यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रेमसुख कटारिया यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. आमदार राहुल कुल व दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे या वेळी उपस्थित होते. कुटुंबीय आणि पदाधिकारी यांच्यासमोर झालेल्या विस्तृत चर्चेनंतर प्रेमसुख कटारिया हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सक्रिय झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

Cannes 2024: हात फ्रॅक्चर तरीही कान्समध्ये दिसला ऐश्वर्याचा जलवा; लेक आराध्याचं 'या' कारणामुळे होतंय कौतुक

Neelam Gorhe : जातीय तेढीमुळे आत्महत्या वाढतात;नीलम गोऱ्हे,कृषी क्षेत्रातील चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्या

SCROLL FOR NEXT