vijay shivtare Sakal Media
पुणे

लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्या : विजय शिवतारे

जेजुरीत पुणेकरांची गर्दी उसळल्याचा दावा.

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा

सासवड : पुरंदर तालुक्यातील (purandar taluka) जेजुरी ग्रामीण रुग्णालय (jejuri rural hospital) येथे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण (vaccination) मोहीम सुरु करण्यात आली आहे. पण याचा लाभ पुरंदरवासियांना कमी आणि पुणेकरांनीच अधिक घेतल्याचे दिसत आहे. याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख (rajesh deshmukh) यांचेशी चर्चा करून लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्यावे., अशी मागणी केली आहे. (define vaccination centers says vijay shivtare).

याबाबत शिवतारे म्हणाले, जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे १८ ते ४४ वयोगटासाठी जवळपास ७०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असल्याने यापैकी जवळपास ८० टक्के लस ही तालुक्याबाहेरून नोंदणी केलेल्या लोकांना द्यावी लागली. पुणे, पिंपरी चिंचवडसह बारामती, दौंड अशा आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा लोकांनी जेजुरी केंद्रासाठी नोदणी केलेली आहे. लोक नोंदणी करून थेट जेजुरीला येत आहेत. पुरंदर तालुक्यातील जेमतेम ६५ ते ७० लोकांना यात लस मिळाली. जेजुरी शहरातील तर केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढेच नागरिक यात समाविष्ट होते. त्यामुळे तालुक्यातील लोक लसीकरणापासून वंचित राहिले.

शिवतारे पुढे म्हणाले, लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून देण्यात यावे अशी मागणी मी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या त्या तालुक्यातील लोकांना तेथील केंद्रात लसीकरणाचा लाभ घेता येईल. सुरळीतपणे लसीकरण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT