पुणे-मुंबई महामार्ग, देहूरोड - कंटेनरला पाठीमागून धडकल्याने आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मोटारीची झालेली अवस्था.
पुणे-मुंबई महामार्ग, देहूरोड - कंटेनरला पाठीमागून धडकल्याने आयकर विभाग अधिकाऱ्यांच्या मोटारीची झालेली अवस्था. 
पुणे

महामार्गावरील अपघातात प्राप्तीकर अधिकाऱ्याचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

देहूरोड - तळेगाव दाभाडे येथे कारवाई करून पुण्याला परतणाऱ्या स्वारगेट पुणे येथील प्राप्तीकर सधन विभागाच्या अधिकाऱ्यांची मोटार एअरब्रेक लॉक झाल्याने रस्त्यावरच उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून धडकून झालेल्या अपघातात विभागाचा एका निरीक्षकाचा मृत्यू झाला. तर उपसंचालकासह तिघेजण जखमी झाले. हा अपघात पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड नजीक अमरदेवी मंदिराच्या अलीकडे गुरुवारी (ता. २३) सकाळी सहाच्या सुमारास झाला.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक अनिल त्यागी (वय २८, मूळ रा. ऋषीकेश उत्तराखंड सध्या रा. अजमेरा महाविद्यालयाच्या मागे हडपसर, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यागी हे प्रशिक्षण पूर्ण करून पाच महिन्यांपूर्वीच प्राप्तीकर सधन पुणे विभागात निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. तर याच विभागाचे उपसंचालक आनंद प्रकाश उपाध्याय (वय ४०) आणि त्यांचे सहकारी अधिकारी कृष्णकुमार मिश्रा (वय ४०) आणि चालक असे तिघेजण जखमी झाले असून, त्यांच्यावर प्रथम सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले नंतर त्यांना हिंजवडी येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी दोन मोटारीतून आलेल्या प्राप्तीकर सधन पुणे विभागाच्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने तळेगाव दाभाडे येथील एका आरएमसी उद्योगावर बुधवारी (ता. २२) छापा घातला. ही कारवाई रात्रभर सुरू होती. ही कारवाई आटोपून पथक गुरुवारी सकाळी माघारी निघाले होते. या पैकी एका मोटारीने मार्गातील अमरदेवी मंदिर पास केले होते. मागील मोटारीने (एमएच. १२ एफ. सी. २६१५) तळेगाव सोडत सोमाटणे टोल नाका पास केल्यावर पुढे अमरदेवी मंदिरानजीक लोखंडी अँगल घेऊन पुणे बाजूला निघालेल्या कंटेनरला (एमएच ०६ के ७९४४) पाठीमागून धडक दिली. जोराची धडक बसल्याने मोटारीची डावी बाजू अर्ध्याहून अधिक कापली गेली. त्यात त्यागी हे गंभीर जखमी झाले. वैद्यकीय तपासणीत त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर उपाध्याय, मिश्रा आणि चालक जखमी झाले.

‘सकाळ’च्या प्रतिनिधीने देहूरोड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यागी यांचा जागीच मृत्यू झाला होता. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT