Delhi government Maharashtra self-esteem Dr Amol Kolhe criticism politics
Delhi government Maharashtra self-esteem Dr Amol Kolhe criticism politics Sakal
पुणे

Amol Kolhe : दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचे काम होतय - डॉ.अमोल कोल्हे

पराग जगताप

ओतूर : शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा प्रश्न असेल बिबट्याचा प्रश्न असेल सातत्याने संसदेत मांडतो त्यासाठी भांडतोय.आज दिल्लीच्या सरकार कडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचे काम होतय.शिवसेनेच्या बाबत काय झाले,राष्ट्रवादीत काँग्रेस बाबत काय झाले आपण सर्व पाहातोय.

महाराष्ट्राचे दोनशे आमदार एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्य मंत्री तिकीट वाटपासाठी दहा वेळा दिल्लीला जातात मात्र कांदा उत्पादक शेतकर्याच्या प्रश्नावर बोलायला जात नाही.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्री ही सातत्याने शिरूर मध्ये येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या या मागणीवर काही बोलत नाही.

बिबट्याच्या प्रश्न विषयी कुणी ठोस भुमिका घेत नाही अशी टिका शिरूर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली.तसेच आता बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवून महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी फुकायची आहे हिच सर्वाना विनंती.तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढील बटन दाबून आपला मतदान रूपी आशिर्वाद द्यावा असे आवाहन यावेळी कोल्हे यांनी केले.

ते जुन्नर तालुक्यातील डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटातील गावामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आयोजित गावभेट व्दौर्या मध्ये उदापूर येथे आयोजित कोपरा सभेत बोलत होते.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट,विघ्नहर अध्यक्ष सत्यशील शेरकर,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उपजिल्हाप्रमुख अनंतराव चौगुले,तालुकाध्यक्ष तुषार थोरात,माजी जि.प.सदस्य शरद लेंडे,अंकुश आमले,मोहित ढमाले,माजी सभापती बाजीराव ढोले,शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे,

शरद चौधरी,सुनिल मेहेर,राहुल सुकाळे,ज्योसना महाबरे,चैताली केंगले,उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे,सरपंच सचिन आंबडेकर,विद्याविकास विकास मंडळ अध्यक्ष प्रभाकर शिंदे,पाडुरंग शिंदे, रोहिदास शिंदे,प्रकाश कुलवडे,संजय शिंदे,संजय बुगदे,संतोष होनराव,पुष्पलता शिंदे,प्रमिला शिंदे,उदापूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व परीसरातील महाविकास आघाडीला मानणारे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

त्या आधी डॉ.अमोल कोल्हे यांचे बनकरफाटा येथे चार जेसीबी च्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून व फटाक्यांच्या आतिष बाजीने स्वगत करण्यात आले.तद नंतर उदापूर गावात बसस्थानका पासून बैल गाडीत मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर उदापूर येथे समाज मंदिरात जाऊन कोल्हे यांनी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले.तद नंतर सह्याद्रीत चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले.

त्यानंतर ग्रामविकास कार्यलया समोर कोपरा सभा घेण्यात आली.उदापूर नंतर नेतवड,माळवाडी असे एकूण डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटातील २५ गावांना भेट दिली.दरम्यान शेतातील कांदा अरणीत कांदा निवडीचे काम करणाऱ्या महिला शेतकर्‍या बरोबर डॉ.अमोल कोल्हे यांनी शेतात जाऊन संवाद साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT