PNE19P30536.jpg
PNE19P30536.jpg 
पुणे

भारत-आफ्रिका लष्करी सरावात भूसुरुंग निकामी करण्याची प्रात्यक्षिके

सकाळवृत्तसेवा

पुणे : "गावात अचानक भूसुरुंग स्फोट होतो, त्यात एक गावकरी गंभीर जखमी होतो. अवघ्या काही मिनिटांत लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल होतात. काही क्षणात जलद हालचाली करत भारतीय जवानांसह आफ्रिकेतील जवान जमिनीत पेरलेले भूसुरुंग निकामी करतात आणि परिस्थिती नियंत्रणात येते आणि गावकऱ्यांना दिलासा मिळतो.' हे सर्व दृष्य आहे भारत आणि आफ्रिकन देशांतील जवानांच्या संयुक्त लष्करी सरावाचे.  हा सराव
सोमवारी पार पडला.

सरावादरम्यान "ह्यूमेनिटरिअन माईन ऍक्‍शन' ही भूसुरुंग निकामी करण्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दापोडीतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये आयोजित या सरावात 17 देशांतील सुमारे 180 जवान सहभागी झाले होते.

भूसुरुंग शोधणे, क्षणार्धात तो नष्ट करणे, स्फोटामुळे इजा झालेल्या नागरिकांना तत्काळ मदत देणे, यांत्रिक वाहने आणि भूसुरुंगांचा शोध घेणाऱ्या श्‍वानांचा मोहिमेत वापर करणे यांची प्रात्यक्षिके जवानांनी या वेळी सादर केली. सदर्न कमांडच्या नियंत्रणाखाली ही प्रात्यक्षिके पार पडली. या सरावाचा समारोप बुधवारी (ता. 27) होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT