Dengue
Dengue 
पुणे

उपनगरांत डेंगीच्या रुग्णांत वाढ

सकाळवृत्तसेवा

मांजरी - नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह हद्दीलगतच्या गावांमध्येही ठिकठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कचऱ्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.  

मांजरी, फुरसुंगी, साडेसतरानळी, केशवनगर, शेवाळवाडी पालिका हद्दीतील जुन्या कालव्याशेजारील वसाहत आदी भागात डेंगीच्या रुग्णाची संख्या लक्षणीय आहे. तसेच थंडी, ताप, खोकल्याचे रुग्णही आढळत आहेत आणि साठलेला कचरा भिजून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापन, नालेसफाई व औषध फवारणीच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोग्य केंद्राच्या वतीने कर्मचाऱ्यांकडून आजारी रुग्णांचे सर्वेक्षण केले जात आहे. घरोघरी जाऊन आरोग्य जपण्याबाबत प्रबोधन केले जात आहे. खासगी दवाखान्यातून डेंगीच्या रुग्णांची माहिती घेतली जात आहे. आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ग्रामपंचायतींना औषध फवारणीबाबत सूचना दिलेल्या आहेत.
- डॉ. डी. जे. जाधव, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र लोणीकाळभोर.

साडेसतरानळी, केशवनगर भागात डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. पालिकेने औषध फवारणी करण्याची गरज आहे. याशिवाय डेंगीची चाचणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी.
- राहुल तुपे, नागरिक, साडेसतरानळी

पावसाळी वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांकडून गावातील विविध भागात औषध फवारणी केली जात आहे. कचरा साठून राहणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
- शिवराज घुले, सरपंच, मांजरी बुद्रुक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT