takli
takli 
पुणे

पाणी जपून वापरण्याचे दिलीप वळसे पाटील आवाहन

सकाळवृत्तसेवा

टाकळी हाजी - आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत साखरेला बाजारभाव कमी आहे. त्यातून साखर कारखानदारी तोट्यात आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीने हुमणी सारख्या रोगाचा झालेल्या प्रार्दुभाव यामुळे उसाचे उत्पादन घटणार आहे. पुढील आठ महिन्यात निर्माण झालेल्या दुष्काळाला सामोरे जात असताना धरणाच्या पाण्याचे व्यवस्थापन करत बंधाऱ्यात, कालव्यात सोडलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करा. पाणी जपून वापरण्याचे आवाहन राष्ट्रिय साखर महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.

जांबूत (ता. शिरूर) येथील मंगल कार्यालयात भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याने शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले  होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वळसे पाटील म्हणाले की, ब्राझील तसेच थायलंड सारख्या देशाने साखरेचे उत्पादन करणे थांबवले आहे. त्यामुळे भविष्यात साखरेची मागणी वाढून भाव वाढण्याची शक्यता आहे. जगात बिट पासून साखरेचे उत्पादन केले जाते. भविष्यात हा देखील प्रयोग करण्यासाठी वंसतदादा शुगर इन्सिस्टूट च्या माध्यमातून करणार आहोत. इथेनॅाल च्या उत्पादनातून साखर कारखान्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी ठिबक सिंचनचा उपयोग करून योग्य बियाणांचा वापर करत अधिका अधिक उसाचे उत्पादन करणे अपेक्षीत आहे. शिरूर तालुक्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याचा मोठी समस्या उभी राहिली असून त्यांना टॅंकर देऊन पाण्याची उपलब्धता करून दिली जाईल. 

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, देवदत्त निकम, प्रकाश पवार, पांडूरंग पवार, प्रदीप वळसे पाटील, राजेंद्र गावडे, अरूणा घोडे आदी शेतकरी उपस्थीत होते.  

जांबूत येथे औटलेट..
कुकडी नदीवर जांबूत या ठिकाणी लवकरच भिमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून औटलेट तयार करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 28 ते 30 लाख रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी कुकडी प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता घेतली आहे. या माध्यमातून जांबूत ते टाकळी हाजी या परीसरातील 6 बंधारे पाण्याने भरून घेता येतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT