पुणे

...जेव्हा दिलीप वळसे पाटील नाचायला लागतात (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील

मंचर :विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चक्क नाचण्याचा आनंद घेतला. मंचर (ता.आंबेगाव) येथे नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाची अंतिम फेरी सुरु असताना अभिनेते उपेंद्र लिमये यांचे आगमन नाचतच झाले. त्यावेळी युवा शक्तीने जोरदार जल्लोष केला. लिमये नाचतच प्रेषकात बसलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या समोर आले. वळसे पाटील उभे राहिले. त्यांनी चक्क दोन्ही हातवर करून नाचत ताल धरला. हे दृश्य पाहून सर्वच युवा प्रेक्षकांनी नाचून व टाळ्यांचा कडकडाट करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

युवक महोत्सवात 40 महाविद्यालयातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनीनी भाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून उपेंद्र लिमये, मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे व अभिनेत्री मालविका गायकवाड यांना निमंत्रित केले होते. प्रथम लिमये यांचे आगमन झाले. त्यावेळी जोगवा चित्रपटातील 'लल्लाटी भंडार' हे गीत सुरु होते. हे गीत म्हणत नाचत नाचत लिमये वळसे पाटील यांच्या समोर आले. वळसे पाटील यांनीही नमस्कार केला. त्यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार जल्लोष केल्याने व लिमये यांचा नाच सुरुच असल्याने हा मोह वळसे पाटील यांना आवरता आला नाही. त्यांनीही काही वेळ दोन्ही हात वर करून ताल धरला. त्यामुळे उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. 



दिलीप वळसे पाटील, किरण वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पूर्वा वळसे पाटील यांच्या हस्ते उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मालविका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

युवकांचा जल्लोष पाहून झालेला आनंद व्यक्त करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, "ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळावा. या उद्देशाने गेली सात वर्ष युवक महोत्सवाचे आयोजन अॅड राहुल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली केले जाते. त्याचा फायदा अनेक मुले व मुलीना झाला असून त्यांना चित्रपट व अनेक मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. स्वतःच्या व इतर कुणाच्याही लग्नात मी आतापर्यंत कधीही नाचलो नाही. युवा पिढीचा उत्साह पाहून मी भरावून गेलो. जीवनात प्रथमच मी नाचून ताल धरला. असे सांगताना वळसे पाटील यांना आनंदा अश्रू लपवता आले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT