Court_Decision
Court_Decision 
पुणे

जिल्हा ग्राहक मंचाचा डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्‍लबला दणका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रवेश रद्द केल्यानंतर फि परत करण्यास नकार देणाऱ्या डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्‍लबला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे. तक्रारदार यांनी फी म्हणून दिलेले 1 लाख 43 हजार 750 रुपये 9 टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश मंचाने क्‍लबला दिले आहेत.


ग्राहक मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. या प्रकरणी हिंजवडी येथे राहणाऱ्या महादेव दुबे आणि त्यांचा मुलगा मानस दुबे यांनी डीएसके शिवाजीयन्स फुटबॉल क्‍लब प्रा.लि. आणि क्‍लबच्या मुख्य कार्यकारी अधिराऱ्या विरोधात मंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार मानस यांनी प्रतिवादी यांच्या लिव्हरपुल एफसी इंटरनॅशनल अॅकॅडमीमध्ये फुटबॉल खेळण्यासाठी प्रवेश घेतला होता. त्याची फी प्रतिवर्षी 5 लाख रुपये होते. तक्रारदार यांनी त्यातील 1 लाख 43 हजार 750 रुपये प्रतिवादी यांच्याकडे जमा केले होते. मात्र जमा केलेली फी परत मिळणार नाही, असे प्रवेश प्रक्रियेत कुठेही नमूद नव्हते. तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश दिला, जाईल असे प्रतिवादींकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तक्रारदार यांच्या शाळेतील प्राचार्यांनी काही कारणांमुळे त्यांना अॅकॅडमीमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे तक्रारदार यांनी अॅकॅडमीकडे प्रवेश रद्द करून शुल्क परत करण्याची मागणी केली. मात्र प्रतिवादी यांनी पैसे परत देण्यास नकार दिल्याने तक्रारदारांनी मंचात धाव घेतली. 

फीचे पैसे आणि मानसिक त्रासापोटी 50 हजार रुपये मिळावे, अशी मागणी तक्रारदार यांनी केली होती. त्यानुसार न्यायालयाने फीचे पैसे व्याजासह व मानसिक त्रासापोटी 50 हजार तक्रारदारांना देण्याचे आदेश क्‍लबला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT