water-supply
water-supply 
पुणे

पिंपरी-चिंचवड शहराला दुप्पट पाणीपुरवठा करा - लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, नागरिकांना दुप्पट पाणीपुरवठा करण्याचा आदेश आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी चिंचवड येथे बैठकीत प्रशासनाला दिला. 

शहरातील नागरिकांना समान पाणीवाटप व्हावे, यासाठी पाणीपुरवठा नियोजनाबाबत महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात गुरुवारी (ता. ५) आढावा बैठक झाली. त्यात आमदार जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसदस्य संदीप कस्पटे, नगरसेविका ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, मकरंद निकम, प्रवीण लडकत, रामदास तांबे आदी उपस्थित होते.

पाणीपुरवठा करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबद्दल आमदार जगताप यांनी माहिती घेतली. पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून डांगे चौकापर्यंतच्या वाहिनीमुळे शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. जलशुद्धीकरण केंद्र ते थेरगाव येथील डांगे चौकापर्यंतचे सुमारे ७.६० किलोमीटर लांबीपैकी ५.६० किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. या कामाची माहिती घेतल्यानंतर जगताप यांनी उर्वरित काम १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT