Dr. Manish Pardeshi
Dr. Manish Pardeshi Sakal
पुणे

डॉ.मनिष परदेशी दुबई क्रिकेट बोर्डच्या हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट पदी

सकाळ वृत्तसेवा

सणसवाडी : शिरुर तालुक्यासह पुणे-नगर महामार्गांवरील अनेक हॉस्पिटलमध्ये तसेच कुस्तीसह क्रिकेट (Cricket) खेळाडूंचे फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) म्हणून प्रसिध्द असलेले डॉ.मनिष दिपक परदेशी (Dr. Manish Pardeshi) यांची नुकतीच दुबई (UAE) इमिरेट्स क्रिकेट बोर्ड च्या हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्टपदी निवड झाली. अशा पध्दतीने इतर देशांतील क्रिकेट खेळाडूंसाठी निवड झालेले ते पहिले भारतीय फिजिओथेरेपिस्ट डॉक्टर ठरलेले आहेत.

डॉ.मनिष परदेशी यांचे वडिल दिपक परदेशी हे रिक्षाचालक असल्याने त्यांचे प्राथमिक ते उच्चशिक्षण अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पूर्ण झाले. डॉ.मनीष यांनी फिजिओथेरपीमधील पदवीचे शिक्षण पुणे येथील मॉडर्न कॉलेजमधून तर पदव्युत्तर शिक्षण पंजाबमधील गुरुनानक देव विद्यापीठ, अमतृसर येथून पुर्ण केले. भारतीय फुटबॉल संघ, भारतीय कबड्डी संघ, १९ वर्षांखालील भारतीय बॅडमिंटन संघ, प्रो कब्बडी लिग मधील पटना पँथर्स संघ, युपी योद्धा संघ, प्रो बॅडमिंटन लीग मधील नॉर्थ-इस्ट वॉरियर्स संघ आदींसोबत त्यांनी यापूर्वी हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.

याच दांडग्या अनुभवाच्या जोरावर त्यांची दुबई (UAE)च्या इमिरेट्स क्रिकेट बोर्ड हेड स्पोर्ट्स फिजिओथेरेपिस्ट पदी निवड झाली असून ते पुढील कार्यभर सांभाळण्यासाठी दुबई येथे रवाना झाल्याची माहिती त्यांचे वतीने त्यांच्या स्नेहीजनांनी दिली.

पुणे-नगर महामार्गाचे भूषण आहेत डॉ.परदेशी

शिरुरपासून ते शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव-भिमा या ठिकाणच्या कुस्ती, कबड्डी, क्रिकेट आदी खेळांमधील सर्व वयोगटातील खेळाडूंसाठी गेल्या काही वर्षांपासून डॉ.परदेशी देवदूतच आहेत. आधुनिक शरीरशास्त्राचा गाढा अभ्यासक असल्याने त्यांनी गरीब खेळाडू-रुग्णांसाठी ज्या उपचार पध्दती अत्यंत स्वस्तात उपलब्ध करुन दिल्यात त्यामुळे शेकडो खेळाडू त्यांचे आभार मानत असून त्या खेळाडूंच्या शुभेच्छा-आशिर्वादांमुळेच डॉ.परदेशी यांची दखल थेट दुबई क्रिकेट संघ व्यवस्थापनाने घेतल्याची प्रतिक्रिया बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिवराव पवार व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीपआप्पा भोंडवे तसेच यांनी दिली.

खेळाडूंसाठी मोफत सल्ला देण्याचे पुण्य कामी आले : शंकर कंधारे

खेळाडूंच्या आर्थिक अडचणींशी पूर्ण समरस होण्याचा डॉ.परदेशी यांचा स्वभाव त्यांनी त्यांच्या वैद्यकीय पेशात आणला आणि खेळाडूंना शारिरिक फिटनेसचा सल्ला मोफत देण्याचा त्यांचा दिनक्रमच झाला होता. त्यांच्या याच पुण्याईचे फळ त्यांना मिळाले आणि त्यांच्या गुणवत्तेला दुबईमध्ये न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय कुस्तीगिर तथा गुरुकुल कुस्ती संकुलाचे संस्थापक शंकर कधांरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT