पुणे

समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी शिक्षण गरजेचे : डॉ. प्रभा अत्रे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशाची संस्कृती, कला शिकविणारे आणि चांगले वाईट समजाविणाऱ्या शिक्षणाचा विचार आपल्याकडे झालेला नाही. आपण जगात भारतीय म्हणून ओळखले जातो. पण आपले भारतीयपण जपण्याचे शिक्षण कुठे आहे? समाज सुसंस्कृत बनविण्यासाठी हेच शिक्षण दिले पाहिजे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले.

दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित अत्रे पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव सुधन्वा बोडस व्यासपीठावर उपस्थित होते. वंचित घटकांसाठी अव्याहतपणे कार्य करणारे, जाणीव, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर यांना गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार, तर पुण्यात सांस्कृतिक चळवळ रुजविणारे स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांना इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार डॉ. अत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भोंडे म्हणाले, 'प्राध्यापक असो की शिक्षक त्यांनी केवळ शिक्षण देण्यापुरते मर्यादित राहू नये. त्यांनी कोणत्याही सामाजिक कार्यात गुंतवून घेतले पाहिजे. त्यामुळे व्यक्तिमत्व अधिक खुलत राहते आणि समाजासाठी देखील शिक्षकाला योगदान देते येते. मी स्वरानंदच्या माध्यमातून सुगम संगीताच्या प्रसारासाठी स्वत:ला गुंतवून घेतले. आता या संस्थेला पन्नास वर्षे होते आहे. लोकाश्रय, कलाकार, कवी यांनी केलेल्या सहकार्यातून हे काम मोठे झाले आहे."

चाफेकर यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, "सामाजिक काम एकट्याचे नाही. त्यासाठी अनेकांना जोडण्याची गरज असते. हे कार्य सांघिक असते. त्याबरोबर स्वत:च्या आयुष्याचे हवन केल्याशिवाय कार्य सिद्धीस जात नाही, काम मोठे होत नाही. समाजाला देणाऱ्या लोकांना पूर्वी पुरस्कार मिळत नसत, ती आताची प्रथा आहे. पण आबासाहेबांसारख्या शिक्षण संस्था उभी करून सामान्यांना शिक्षण देणाऱ्या व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे."

चाफेकर म्हणाले, "महिलांसाठी त्यातही वेश्येंच्या उद्धारासाठी काम केले. मुलींसाठी निहार उपक्रम सुरू केले. अनेक मुलींना उभे केले. पण रिंगरोडमुळे संस्थेची सर्व जमीन त्यासाठी द्यावी लागणार आहे. त्यामुळे निहाक बंद करावे लागणार आहे. परंतु आम्ही थांबलो नाही. आता विधवांसाठी लातूरमध्ये काम सुरू केले आहे. त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम सुरू केले आहे. सुमारे साडेचारशे महिला त्यांच्या घरातील कर्ता झाल्या आहेत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT