डॉ. सायरस पुनावाला
डॉ. सायरस पुनावाला 
पुणे

डॉ. पूनावाला यांचा दुबईत सन्मान

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरम (एबीएलएफ) तर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रतिष्ठेचा हा पुरस्कार दुबई यूएईमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात डॉ. पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. 

जागतिक स्तरावर लसीकरण आणि त्या माध्यमातून रोगनिर्मूलन यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आणि विविध स्तरांवर दिशादर्शक सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. पूनावाला यांच्या शिरपेचात हा सन्मान म्हणजे आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील आघाडीची बायोटेक कंपनी असून, तिची स्थापना १९६६ साली झाली. ही कंपनी विविध आजारांवरील उपाय ठरणाऱ्या जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी (डोसांच्या संख्येनुसार) जगातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. कंपनीने जगभरातील आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील ४० दशलक्ष हून अधिक मुलांना जीवरक्षक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.

डॉ. पूनावाला यांना जून महिन्यात ऑक्‍सफर्ड विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची डॉक्‍टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT