2Stamp_Registration_Office.jpg
2Stamp_Registration_Office.jpg 
पुणे

पुणे : निवडणुकीच्या कामामुळे दस्त नोंदणी कार्यालयातील व्यवहार ठप्प

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील 26 पैकी 20 दुय्यम निबंधक कार्यालय मंगळवारी बंद ठेवण्यात आली. परिणामी दस्त नोंदणीचे काम ठप्प झाल्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार नागरिकांशी संबंधित महसूल जमा होणारी कार्यालय बंद ठेवता येत नाहीत. मात्र शहरातील वीस दुय्यम निबंधक कार्यालय निवडणुकीच्या कामकाजासाठी आज अचानक बंद ठेवण्यात आली. त्याचा दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना चांगलाच फटका बसला. ऐन वेळेस दस्त नोंदणीसाठी नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून आली.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील सर्वर डाऊन आणि तांत्रिक अडचणीमुळे दस्त नोंदणीसाठी बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यामुळे क्लाऊड प्रणाली सुरू करण्यात आली. त्यानंतरही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे दस्त नोंदणी ठप्प होण्याचे प्रकार घडले. आता निवडणुकीच्या कामकाजामुळे दस्त नोंदणी बंद झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT