manchar
manchar 
पुणे

मंचरच्या वाहतूक कोंडीमुळे टळले साखरपुडा, लग्नाचे मुहूर्त

डी. के. वळसे पाटील

मंचर : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर रविवारी (ता. १२) मंचर (ता.आंबेगाव) येथे सकाळी व दुपार नंतर वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. संध्याकाळी चार पर्यंत वाहतूक कोंडी कायम होती. लग्नतिथी मोठी असल्याने व प्रवासाला विलंब लागत असल्याने अनेकांचे साखरपुडा, टिळा व लग्नाचे मुहूर्त टळले. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

मंचरचा आठवडे बाजार रविवारी भरतो. त्यातच लग्नतिथी मोठी असल्यामुळे वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. अवजड यंत्रसामग्री नेणारी वाहने व कंटेनरची संख्याही या रस्त्यावर अधिक आहे. तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील उत्पादीत माल गुजरात व मध्यप्रदेशमध्ये नेण्यासाठी या महामार्गाचा वापर केला जातो. गेटवेल हॉस्पिटल, मुळेवाडी चौक, पिंपळगाव फाटा ते जीवन मंगलकार्यालय या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. 

मंचर परिसरात एकूण आठ मंगलकार्यालये आहेत. वऱ्हाडी मंडळींची संख्या अधिक होती. सकाळी ११ वाजता अतिशय मंद गतीने वाहतूक सुरु होती. दुपारी बारा ते दीड या वेळेत वाहतूक कोंडी झाली होती. संध्याकाळी चार वाजता पुन्हा वाहतूक कोंडी होण्यास सुरवात झाली. शिवशाही, एशियाड, एसटी व खासगी लक्झरी बसेस मधील प्रवाश्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. महिला, मुले व जेष्ठ नागरिकांचे हाल झाले. मंचर पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे पोलीस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. पण अपुरा पडत असलेला रस्त्यामुळे पोलिसही हतबल झाले होते. काही बेशिस्त वाहनचालक वाहतूक नियमाकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या विरुद्ध दिशेनेही आपले वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळेहि वाहतूक कोंडीत भर पडत होती. सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाच्या एका सेवानिवृत्त मुख्य अभियंत्यालाचे वाहनही वाहतूक कोंडीमुळे मंचर परिसरात तब्बल अर्धातास रांगेत होते.    

''मंचरच्या बाह्य वळणांचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुलभ होणार आहे. वाहतूक कोंडीच्या समस्येला नागरिक, व्यापारी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाहि तोंड द्यावे लागत होते. कांदा विक्रीसाठी आणणारे अनेक ट्रॅकटर वाहतूक कोंडीत अडकले होते. तांबडेमळा, शेवाळवाडी, निघोटवाडी, मंचर, एकलहरे या भागातून जाणाऱ्या चौपदरीकरण रस्त्याच्या बाह्यवळणाची कामे बंद आहेत. हि कामे पूर्ण झाल्यानंतरच मंचरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल.'' असे मंचर येथील अडते सागर थोरात यांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT