Eco-Friendly-Bappa
Eco-Friendly-Bappa 
पुणे

बनवा ‘इको फ्रेंडली’ बाप्पा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात, विहिरीत विसर्जित करून ते पाणीसाठे दूषित करण्याऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती पुजून नंतर त्या कृत्रिम जलकुंडात विसर्जित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घराघरांत जावी व आपला लाडका बाप्पा स्वत:च्या हाताने तयार करण्याची संधी ‘सकाळ’ घेऊन येत आहे. त्यासाठी गणेशमूर्ती घडविण्यास शिकवणारी अभिनव कार्यशाळा रविवारी (ता. १८) आयोजित केली आहे.

फिनिक्‍स मार्केट सिटी (विमाननगर), पुणे सेंट्रल मॉल (कर्वे रस्ता व विद्यापीठ रस्ता), पाठशाळा (बालेवाडी, रहाटणी), क्‍लारा ग्लोबल स्कूल (घोरपडी), नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल (चिंचवड), सिटी प्राइड स्कूल (निगडी), अभिषेक इंटरनॅशनल स्कूल (मोशी), सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी), अभिरुची मॉल अँड मल्टिप्लेक्‍स (सिंहगड रस्ता), एडीफाय इंटरनॅशनल स्कूल (हिंजवडी), सिटी इंटरनॅशनल स्कूल (कोथरूड), सनशाइन प्री-स्कूल (आंबेगाव बुद्रुक) येथे सकाळी १० ते ११.३० वाजता कार्यशाळा होणार आहे. विद्यार्थ्यांनी येताना सोबत बसण्यासाठी मॅट, कंपास पेटी, पाण्याची बाटली, छोटा रुमाल, जुने वर्तमानपत्र, पेंटिंगचा ब्रश, बाऊल, तिकीट सोबत आणावे. बाप्पाला दागिने तयार करण्यासाठी सोबत डाळी, कडधान्ये आणली तरी चालणार आहे. सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

SCROLL FOR NEXT