पुणे

सुविधा नसल्याचा कर्मचाऱ्यांना फटका

सकाळवृत्तसेवा

पुणे - यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा बळी आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नाट्यकर्मींकडून व्यक्त होत आहे. लोखंडाऐवजी लाकडी विंगा, आपत्कालिन घटनेवेळी प्रथमोपचार अशा सुविधांच्या अभावाचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

‘महापालिकेअंतर्गत १४ नाट्यगृहे आहेत. परंतु कर्मचारी, सामग्री किंवा सुरक्षेच्या दृष्टीने अन्य गोष्टी यामध्ये व्यवस्थापन नाही. हे शनिवारी (ता.२३) घडलेल्या घटनेवरून सिद्ध झाले.  अशी टीका नाट्यकर्मी आणि व्यवस्थापक करीत आहेत. 

काही नाट्यकर्मींनी ‘सकाळ’शी बोलताना महापालिकेच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले. साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी डॉ. श्रीराम लागू यांच्या नाटकाचा प्रयोग सुरू असताना विंग पडली होती. तीन ते चार वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील प्रयोगादरम्यान रंगमंचावर अचानक माकड आले होते, या घटनांची आठवण नाट्य व्यवस्थापक निकिता मोघे यांनी या वेळी करून दिली. त्या म्हणाल्या, की एवढ्या भयंकर घटना घडूनही परिस्थिती बदलेली नाही. अजूनही अनेक नाट्यगृहांतील पिटामध्ये उंदीर, घुस फिरत असतात. 

नाट्यगृहात आपत्कालीन स्थिती कधीही ओढवू शकते. त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा हवी. नाटकाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले नाट्यकर्मी किंवा नाट्य परिषदेचे प्रतिनिधी यांची नेमणूक त्यावर करायला हवी. यामुळे त्यांच्या योग्य त्या सूचनांमुळे अडचणींवर मात करता येईल.
- सुरेश देशमुख, माजी अध्यक्ष, नाट्य परिषद, पुणे शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT