urvande
urvande 
पुणे

उरवडे येथील केझर कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर उत्खनन

धोंडिबा कुंभार

पिरंगुट : उरवडे (ता.मुळशी) येथील केझर काँप्रेसर कंपनीने कोणत्याही खात्याची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर उत्खनन व अनधिकृत सीमाभिंत उभारली आहे. सदरचे बांधकाम पाडण्यासाठी पीएमआरडीचे अतिक्रमण विरोधी पथक येऊनही कोणतीही कारवाई न करता माघारी फिरले. याबाबत पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम आणि महानियोजनकार विभागाच्या टोलवाटोलवीमुळे सदरचे पथक हात हालवीत परत गेल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्याने केला आहे.    

  
याबाबत येथील शेतकरी सुनील शेलार यांनी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही सर्वच विभागांनी कंपनीला पाठीशी घातल्याचा आरोप शेलार 
यांनी केला आहे. कंपनीने शेलार यांच्या शेतात अनधिकृत अतिक्रमण करून टेकडी फोडून रस्ता काढला होता. त्याला शेलार यांनी विरोध केला व महसूल 
विभागाकडे तक्रारही केली होती. शेलार यांच्या तक्रारीवरून मुळशीच्या तहसीलदारांकडून कंपनीला बेकायदेशीर उत्खननाबद्दल वेळोवेळी २ कोटी ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड न भरल्याने महसूल विभागाने कंपनीच्या क्षेत्राच्या सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात सदरच्या रकमेचा बोजा नोंदविला. 


याबाबत बापू शेलार व सुनील शेलार म्हणाले, " टेकडीफोड आणि उत्खननातील खोदलेला मुरुम व माती आमच्या शेतात वाहून येण्याचा धोका असून घर, शेत व गुरांचा गोठा त्याखाली गाडण्याच्या धोका आहे. याशिवाय ही उभारलेली सीमाभिंतही कोसळण्याचा धोका असून जीवितहानीही होईल." पीएमआरडीचे महानियोजनकार विजय गोस्वामी म्हणाले , " कंपनीला दीड मीटर उंचींच्या सिमाभिंत बांधकामाची परवानगी दिली असून उर्वरित अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

" पीएमआरडीच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक मिलिंद पाठक  म्हणाले , " गोस्वामी यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई थांबविण्यात आली होती. " याबाबत कंपनीच्या प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.
              

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT