chandrakant Patil
chandrakant Patil sakal
पुणे

Chandrakant Patil : बोगस बियाणे, रासायनिक खते विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा

सकाळ वृत्तसेवा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा झाली. या बैठकीत बोलताना त्यांनी आदेश दिला.

पुणे - पुणे जिल्ह्यातील आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत आणि बोगस बियाणे, खते, किटकनाशकांच्या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.१२) जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्ह्याची खरीप हंगामपूर्व आढावा झाली. या बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला. या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, 'आत्मा'चे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, 'यंदा अल निनोचा परिणाम पाहता, खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासू शकते. अशावेळी दुबार पेरणी करण्याची वेळ आल्यास, बियाणे, खते आणि किटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी बियाणे व खतांचा राखीव साठा उपलब्ध असला पाहिजे. बोगस बियाणे, खते आणि किटकनाशांच्या बाबतीत तक्रार प्राप्त होताच, तत्काळ तपासणी करून तथ्य आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे द्यावीत. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी.'

या बैठकीत कृषिपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पीक कर्ज वाटप, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठीची कर्जमंजुरी ऊसाचे पाचट न जाळता कुजविण्यासाठी पाचट व्यवस्थापनाला प्रोत्साहन आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी खरीपासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहितीवर आधारित सादरीकरण केले. बियाणे, रासायनिक खतांची मागणी, उपलब्धता, निविष्टा गुणवत्ता नियंत्रण, कृषि यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, राष्ट्रीय कृषि सिंचन योजना, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रारंभी पालकमंत्री श पाटील यांच्या हस्ते २०२३-२४ साठी कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यस्तरीय खरीप हंगाम २०२२ च्या पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. आत्मा यंत्रणेमार्फत तयार करण्यात आलेल्या विविध घडीपत्रिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update:"राम कृष्ण हरी," म्हणत पंतप्रधानांचे सोलापुरातील भाषण सुरू

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT