Filed a crime for False documentary case against Hanumant Nazirkar in Baramati
Filed a crime for False documentary case against Hanumant Nazirkar in Baramati 
पुणे

हनुमंत नाझिरकरांवर बारामतीत खोटे दस्तप्रकरणी गुन्हा दाखल

मिलिंद संगई

बारामती : अमरावतीच्या नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझिरकर पत्नी संगीता नाझिरकर मुलगी गीतांजली नाझिरकर तसेच इतर तिघांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात आज खोटे दस्त करारनामा करुन 2 कोटी 90 लाखांची फळे खरेदी केल्याचे भासविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. 

राहुल शिवाजी खोमणे, हनुमंत जगन्नाथ नाझिरकर, संगीता हनुमंत नाझीरकर, गीतांजली हनुमंत नाझीरकर, सतीश भीकाराम वायसे (सर्व रा. शिरवली,  ता. बारामती, जि. पुणे) गुलाब देना धावडे (रा.सोमनथळी ता.फलटण जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाजली छोटू बागवान (रा. म्हाडा कॉलनी, बारामती) यांनी या बाबत फिर्याद दाखल केली आहे. 

या बाबत फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, हनुमंत नाझिरकर याच्या सांगण्यावरुन काळे धन शेती उत्पन्नाचे आहे असे दाखविण्यासाठी राहुल खोमणे याने माझ्यासह इतर पाच जणांचे स्टँपपेपरवर खोटे करारनामे केले आहेत. आपण आंबा व चिकू शिवाय कोणतीच फळे घेतली नसताना व सव्वा लाख रुपये व्यवहारापोटी दिलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र 74 लाख 40 हजार रुपयांची रक्कम दाखवली गेली. इरफान युनुस बागवान यांचा व्यवहार साडेतीन लाखांचा असताना 1 कोटी 83 लाख, मोहमद शरीफ बागवान यांची 29 लाख असे 2 कोटी 90 लाख रुपये करारनाम्यावर दाखवून फसवणूक केली आहे. पोलिसांनी या संदर्भात अदयाप कोणालाही अटक केली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT